ETV Bharat / state

औरंगाबाद: विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी सासरच्या सहा जणांवर गुन्हा - Kannad crime news

पूजा नवलसिंग कायटे यांना सासरच्या लोकांनी वेळोवेळी पैशाची मागणी केली. त्यामुळे त्यांनी शारीरिक व मानसिक छळास कंटाळून आत्महत्या केल्याची घटना भिलदरी (ता.कन्नड) येथे बुधवारी सकाळी सहा वाजता उघडकीस आली होती.

पूजा नवलसिंग कायटे
पूजा नवलसिंग कायटे
author img

By

Published : Feb 4, 2021, 10:17 PM IST

कन्नड(औरंगाबाद) - विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी सासरच्या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूजा नवलसिंग कायटे (वय 24) असे मृत विवाहितेचे नाव आहे.

पूजा नवलसिंग कायटे यांना सासरच्या लोकांनी वेळोवेळी पैशाची मागणी केली. त्यामुळे त्यांनी शारीरिक व मानसिक छळास कंटाळून आत्महत्या केली. ही घटना भिलदरी (ता.कन्नड) येथे बुधवारी सकाळी सहा वाजता उघडकीस आली होती.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वडिलांचे छत्र हरवलेल्या पूजाचा विवाह 2013 मध्ये भिलदरी येथील नवलसिंग कायटे याच्याशी झाला. पूजाच्या माहेरची परिस्थिती गरिबीची असल्याने मामा इंदल लकवाल यांनी स्वतःची एक एकर जमीन विकून तिचे लग्न थाटामाटात लावून दिले. दीड ते दोन वर्षे सासरच्या लोकांनी व्यवस्थित वागविल्यानंतर शेतात पाईपलाईन टाकण्यासाठी दोन लाख रुपयाची मागणी केली. परंतु माहेरी गरिबी असल्याने व मामाने पैसे देण्यास असमर्थता दर्शविल्याने सासरच्या लोकांनी पूजाला तिच्या मामाकडे गल्ले बोरगाव येथे आणून सोडले.

हेही वाचा-आम्ही सरकारी कंपन्या विकू देणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा इशारा

सासरच्या लोकांना समजावून सांगितल्याने पूजाला पुन्हा सासरी पाठविण्यात आले. दीड ते दोन वर्षानंतर पती नवलसिंग व दिर अर्जुन कायटे यांनी पुन्हा पिकअप गाडी घेण्यासाठी दोन लाखांची मागणी केली. पैशाची मागणी पूर्ण होत नसल्याने नवरा, सासू, सासरे यांनी शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. मामा लकवाल यांनी कसेबसे जमवाजमव करून चाळीस हजार रुपये दिले होते.

हेही वाचा-'कायद्याबाबत माघार घेता येत नसेल तर सरकारमधून माघार घ्यावी'

मंगळवारी (2 फेब्रुवारी) सकाळी अकरा वाजता पूजाने मामा लकवाल यांना फोन करून नवरा, सासू, सासरा व दीर जास्तच त्रास देत असल्याचे सांगितले. दरम्यान पूजाच्या पतीने पिशोर पोलीस ठाण्यात मध्यरात्री बारा वाजता बेपत्ता असल्याची खबर दिली.

बुधवारी सकाळी सहा वाजता पतीस विचारणा केली असता त्यांनी शेतातील विहिरीत पूजाच्या चपला तरंगत असल्याची माहिती दिली. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. नाचनवेल येथे डॉ. संजय राजभोज यांनी दुपारी तीन वाजता शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.
इंदल विठ्ठलसिंग लकवाल (वय 37, रा.गल्ले बोरगाव) यांनी पती नवलसिंग कायटे, सासरा शंकर फुलसिंग कायटे, दिर अर्जुन कायटे (सर्व रा.भिलदरी), मावस सासू हिराबाई बारवाल, मावस सासरा रामलाल हिरालाल बारवाल (रा.गल्ले बोरगाव) यांच्या विरुद्ध शारीरिक व मानसिक त्रास दिल्याने आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तीनही आरोपीना 17 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.