ETV Bharat / state

JP Nadda And Chandrakant Khaire : नड्डा यांच्या भाषणाला खैरेंचे कीर्तन भारी!

भाजप देशातील सर्वात मोठा पक्ष आहे. त्याच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सभेला येत असताना लोकांनी सभेकडे पाठ फिरवली. (JP Nadda in Aurangabad). मात्र दुसरीकडे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी आयोजित केलेल्या इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाला तुफान गर्दी झाली होती. (Chandrakant Khaire in Aurangabad)

JP Nadda and Chandrakant Khaire in Aurangabad

author img

By

Published : Jan 3, 2023, 5:46 AM IST

औरंगाबाद : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची जाहीर सभा चांगलीच चर्चेत राहिली. (JP Nadda in Aurangabad). ऐन भाषणाच्या वेळी नागरिकांनी काढता पाय घेतल्याने लोकसभेची पायाभरणी अशीच असेल का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तर दुसरीकडे त्याच वेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या आयोजित कीर्तनाला सभेहून अधिक गर्दी असल्याने नड्डा यांच्या भाषणाला खैरेंच कीर्तन भारी पडलं असं म्हणायची वेळ आली आहे. (Chandrakant Khaire in Aurangabad)

नड्डा यांच्या सभेला गर्दी जमवण्यात अपयश : 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला भाजपाने सुरुवात केली आहे. भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत राज्यभर सभा घेण्यात येत आहे. नवीन वर्षाची सुरुवात नव्या उमेदीने करण्यात संकल्प भाजपने घेतला. मराठवाडा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. आठ जिल्ह्यांपैकी चार जिल्ह्यांमध्ये शिवसेना लोकसभा निवडणुकीचा उमेदवार उभा करतो आणि याच ठिकाणावरून भाजपने दावा करत औरंगाबाद येत नड्डा यांची सभा घेण्याचा नियोजन केलं. या सभेतून शिवसेनेला इशारा देत भाजप आपली ताकद दाखवेल असं वाटत होतं. मात्र राजकीय सभांसाठी प्रसिद्ध असलेल्या सांस्कृतिक मंडळ वर गर्दी करण्यास भाजप सपशेल अपयशी ठरलं. रेकॉर्ड ब्रेक गर्दी होईल असा भाजपने दावा केला होता. मात्र तो फोल ठरल्याच पाहायला मिळालं. नड्डा भाषणासाठी उभे झाले असताना अर्ध्याहून अधिक मैदान रिकामं झालं. याबाबत उशीर झाल्यामुळे लोक गेली अशी सावरासावर भाजपकडून करण्यात येत आहे.

जेपी नड्डा यांची जाहीर सभा
जेपी नड्डा यांची जाहीर सभा
जेपी नड्डा यांची जाहीर सभा
जेपी नड्डा यांची जाहीर सभा

खैरेंच्या कीर्तनाला तुफान गर्दी : भाजप देशातील सर्वात मोठा पक्ष आहे. त्याच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सभेला येत असताना लोकांनी सभेकडे पाठ फिरवली. मात्र दुसरीकडे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी आयोजित केलेल्या इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाला तुफान गर्दी झाली होती. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा एक जानेवारी रोजी वाढदिवस असतो. त्या प्रित्यर्थ वाळूज परिसरात इंदुरीकर महाराजांचे कीर्तन आयोजित करण्यात आले. संध्याकाळी साडेसातच्या सुमारास हे कीर्तन सुरू झाले. त्यावेळी जागा मिळेल तिथे लोकांनी गर्दी केली होती. त्यामुळे नड्डा यांच्या भाषणाला खैरेंच कीर्तन भारी पडलं अशी चर्चा आता रंगली आहे.

चंद्रकांत खैरे यांचे आयोजित कीर्तन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.