औरंगाबाद: इरफान खान यांनी या अगोदर उर्दू विषयांमध्ये मास्टर्स डिग्री तसेच जनसंवाद व पत्रकारिता मध्येही पदव्युत्तर पदवी मिळविलेली आहे. त्यांनी “सय्यद इम्तियाज अली ताज की ड्रामा निगारी का तनखीदी व तजजियाती मुताअला” या विषयावर डॉक्टरेट मिळवली. मौलाना आझाद महाविद्यालयाच्या उर्दू विभाग प्रमुख डॉ. काझी नवीद अहमद सिद्दिकी यांच्या मार्गदर्शनाखाली शोध प्रबंध सादर केला होता. २०१४ मधे त्यांनी नोंदणी करून आपला रिसर्च सुरू केला होता. विशेष म्हणजे त्यांची पत्नी राबिया खान यांनी पण त्यांच्या सोबत पी.एच.डी पूर्ण केली. राबिया यांनी महिलांबाबत विषयावर आपला शोध प्रबंध पूर्ण केला. त्यांनी देखील २०१४ मधे आपली नोंदणी केली होती. पत्नीमुळे माझी पी.एच.डी पूर्ण करू शकलो अशी भावना पोलीस हेड कॉन्स्टेबल इरफान खान यांनी व्यक्त केली.
सय्यद इम्तियाज अली ताज हे उत्कृष्ट लेखक होते. त्यांच्या नाटकांमध्ये 1922 मध्ये लिहिलेले “अनारकली” चा ही समावेश असून त्या आधारावर भारतासहित अनेक देशांमध्ये विविध प्रकारचे शो, नाटक आणि मुगल-ए- आजम सारखे चित्रपट ही बनविले गेले आहेत. त्यांच्या लिखणांपासून प्रेरणा आणि ऊर्जा मिळते असा विश्वास इरफान खान यांना होता. विनोदी, महिलांविषयी, सामाजिक, प्रेमकथा अशा विविध विषयांवर त्यांनी लिखाण केले ते मनाला शिवते, त्यामळे तांच्यावर पी.एच. डी करण्याचा निर्णय घेतला. अशी भावणा इरफान खान यांनी व्यक्त केली.
तब्बल आठ वर्षांनी त्यांनी आपला प्रबंध पूर्ण केला असून इरफान खान यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पीएचडी ही शिक्षणातील सर्वोच्च पदवी प्रदान केली आहे. इरफान खान यांनी औरंगाबादचे पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, एडीजी संजय कुमार, आय जी डॉ. जय जाधव, सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक थोरात, माजी सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. खुशालचंद बाहेती, आणि डॉ. एच एस भापकर यांचे सहकार्य मिळाल्यामुळे आभार प्रकट केले.
हेही वाचा : Electricity Bill Subsidy : उद्योजकांना मिळणारे वीज अनुदान द्या, अन्यथा...