ETV Bharat / state

Independance Day 2023 : ध्वजारोहण सोहळ्यात राजकारण; घटनाबाह्य पालकमंत्री म्हणत माजी खासदारांनी भेट टाळली - Chandrakant khaire

आज देशभर स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे. मंत्रालयात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी पुन्हा औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांचा घटनाबाह्य पालकमंत्री असा उल्लेख करत ध्वजारोहण झाल्यानंतर भेट घेणे टाळले. तर खैरे यांच्या टीकेला संदीपान भुमरे यांनी उत्तर दिले आहे.

sandipan bhumre
संदीपान भुमरे
author img

By

Published : Aug 15, 2023, 3:56 PM IST

प्रतिक्रिया देताना संदीपान भुमरे

औरंगाबाद : शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम पुन्हा एकदा राजकीय टीकांमुळे चर्चेत राहिला. ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी ध्वजारोहण कार्यक्रम झाल्यावर पालकमंत्र्यांची भेट न घेताच बाहेर पडले, हे तर घटनाबाह्य पालकमंत्री असल्याची टीका खैरे यांनी केली. त्यावर संदीपान भुमरे यांनी टीका करत, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि मी पालकमंत्री झाल्याचे खैरे यांना पाहवत नाही, असे ते म्हणाले.

चंद्रकांत खैरे कार्यक्रम सोडून गेले : स्वातंत्र्य दिवसाचा ध्वजारोहण सोहळा विभागीय आयुक्त कार्यालय येथे पार पडला. झेंडावंदन झाल्यावर पालकमंत्री, लोकप्रतिनिधी हे जनतेच्या भेटीगाठी घेत शुभेच्छा देतात. मात्र, ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे आधीच निघून गेले. ही काही त्यांची पहिली वेळ नाही. शिंदे गट भाजपासोबत गेल्यानंतर त्यांचे निकटवर्तीय असलेले मंत्री संदीपान भुमरे यांच्यात दुरावा निर्माण झाला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर भूमरे यांना पालकमंत्री पद दिले. त्यानंतर मागील वर्षी झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात देखील चंद्रकांत खैरे कार्यक्रम सोडून गेले होते. दुसऱ्या वर्षी देखील त्यांनी भुमरे यांची भेट टाळली आणि निघून गेले.

चंद्रकांत खैरे हे ध्वजारोहण कार्यक्रम झाल्यावर भेट न घेताच बाहेर पडले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि मी पालकमंत्री झाल्याचे खैरे यांना पाहवत नाही - संदीपान भुमरे, पालकमंत्री

हे तर घटनाबाह्य पालकमंत्री : कार्यक्रम सोडून जात असताना चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया देत असताना, हे तर घटनाबाह्य पालकमंत्री असल्याची टीका केली. आमचे सरकार येईपर्यंत मी पालकमंत्र्यांना भेटणार नाही. हे सरकार घटनाबाह्य आहे, लवकरच आमचे सरकार येणार आहे, असे खैरे म्हणाले. मात्र, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि मी पालकमंत्री झालेले खैरे यांना मान्य नाही. म्हणून ते असे करतात. हा माझा नाही तर पालकमंत्री पदाचा अवमान आहे. त्यांनी मानो या ना मानो काय फरक पडत नाही, अशी टीका भुमरे यांनी केली. यापुढे त्यांचे सरकार कधीही येणार नाही. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात युती सरकार पुढे राहील, असा विश्वास पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी व्यक्त केला.

हेही वाचा -

  1. Independence Day 2023: आमच्या डोक्यावरील शरद पवार यांचे आशिर्वाद कोणीही काढू शकत नाही-प्रफुल पटेल
  2. Independence Day 2023: राज्य व केंद्र यामधील समन्वयाचा नवा अध्याय आपण लिहित आहोत- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
  3. Independence Day 2023: ना अजित पवार, ना चंद्रकांत पाटील.. पुण्यातील विधानभवनामध्ये राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.