वैजापूर (औरंगाबाद) - गोदावरी व शिवना या दोन पात्रातील लिलाव प्रक्रिया काही दिवसांपूर्वी पार पडली. यंदा तीन वाळू घाटांपासून महसूल प्रशासनाला १ कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित होता. मात्र ठेकेदारांच्या 'टस्सल' मुळे तब्बल ८ कोटी १९ लाख रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळाला आहे. एक मार्च पासून या उत्खलनाला सुरूवात देखील झाली आहे. मात्र या उत्खनातुन एक गंभीर बाब समोर आली आहे. वाळू लिलाव प्रक्रियेच्या नियमानुसार लिलाव झालेल्या घाटांमधून ठरवून दिलेल्या मापा एवढा वाळू उपसा हा ट्रकटर द्वारे मजुरांच्या साह्याने लिलाव हद्दीच्या बाहेर टाकून तिथून वाहतूक करणे असा नियम आहे. हे सर्व नियम पायमल्ली करून वैजापूर च्या बाभूळगांव येथे जेसीबी व पोक्लेन च्या साह्याने ठेकेदारांनी वाळू उपसा सुरू केला आहे. जिथं यंत्राची परवानगीच नाही तिथं थेट ते पाच ते सहा जेसेबी व पोक्लेनच्या साह्याने उपसा सुरू केला आहे.
अलिखित परवानगी - विशेष म्हणजे या सर्व नियमबाह्य उत्खलनाला गावकऱ्यांनी देखील विरोध दर्शवला आहे. असे असले तरी या यंत्राद्वारे ह्या होणाऱ्या नियमबाह्य उत्खननाला अलिखित परवानगी दिली तरी कुणी, हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे या गंभीर प्रकराचे व्हिडिओफीत देखील सोशल मीडियावर व्हायरल होण्यास सुरुवात झाली आहे. हा सर्व नियमबाह्य प्रकार चार दिवसांपासून सुरू असला तरी प्रशासनाने ह्या ठिकाणी साधी कारवाई होतांना दिसली नाही.
अभय कुणाचे ? - एक तारखेपासून ठेकेदारांना आपल्या वाळु घाटाचा ताबा मिळाला आहे. एक तारखेपासूनच ह्या सर्व ठिकाणी यंत्रणा वापरून वाळू उपसा केला आहे. यांची चर्चा जिल्ह्यभर पसरली असली तरी मात्र प्रशासन आमच्या पर्यंत असे व्हडिओ पोहचले नसल्याचे सांगतात ही मात्र गंभीर बाब म्हणावी लागेल. तर शासकीय टेंडर झालेल्या ठिकाणाचा ताबा ठेकेदारांना एक तारखेला देण्यात आला आहे. नियमानुसार जेसीबी व पोक्लेन सारख्या यंत्रणा वापरून उपसा करता येत नाही. असे होत असे तर निश्चित कारवाई करू, असे वैजापूरचे तहसीलदार राहूल गायकवाड यांनी सांगितले.