ETV Bharat / state

जुन्या वादातून पतीने न्यायालयाच्या आवारातच पत्नीला भोसकले

कारभारी गवळी (७२) याने पत्नी केसरबाई गवळी यांच्यावर चाकूने सपासप वार केले. वृद्धेच्या छातीसह पोटात, डोके व पाठीत वार केल्याने ती गंभीर जखमी झाली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी गेले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वृद्धेला तात्काळ रूग्वाहिकेव्दारे येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तेथे नेईपर्यंत वृद्धा गतप्राण झाली होती.

husband killed wife for family dispute in vaijapur at aurangabad
जुन्या वादातून पतीने न्यायालयाच्या आवारातच पत्नीला भोसकले
author img

By

Published : Oct 3, 2020, 10:28 PM IST

वैजापूर (औरंगाबाद) - जमिनीच्या जुन्या वादातून वृद्ध पतीने ६५ वर्षीय वृद्ध पत्नीचा चाकूने भोसकून खून केला. ही खळबळजनक घटना ३ ऑक्टोबरला वैजापूर येथील न्यायालयासमोर घडली. आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास वैजापूर पोलीस करत आहेत. केसरबाई कारभारी गवळी (वय ६५, रा. घायगाव) असे मृताचे नाव आहे.

गवळी व त्याची पत्नी केसरबाई यांच्यात जमिनीवरून वैजापूर येथील न्यायालयात गेल्या २५ वर्षांपासून वाद सुरू होते. दोघेही विभक्त राहत होते. कारभारी गवळी यांनी दुसरे लग्न केले होते. केसरबाई ही त्याची पहिली पत्नी होती. जुन्या वादावरून न्यायालयाच्या आवारात पुन्हा वाद झाल्याने कारभारी यांनी आपल्या वृद्ध पत्नीची हत्या केली.

या घटनेची पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गवळी व त्याची पत्नी केसरबाई यांच्यात वाद होते. वादाची सुनावणी असल्यामुळे अन्य नातेवाईकांसोबत न्यायालयात आले होते. परंतु सुनावणीला जाण्यापूर्वीच त्यांच्यात वाद झाला. त्यामुळे संतापलेल्या कारभारी गवळी (७२) याने पत्नी केसरबाई गवळी यांच्यावर चाकूने सपासप वार केले. वृद्धेच्या छातीसह पोटात, डोके व पाठीत वार केल्याने ती गंभीर जखमी झाली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी गेले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वृद्धेला तात्काळ रूग्वाहिकेव्दारे येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तेथे नेईपर्यंत वृद्धा गतप्राण झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी कारभारी किसन गवळी (वय ७२, रा. घायगाव) याला ताब्यात घेतले आहे. वैजापूर पोलीस अधिक तपास करत असून अन्य आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.