औरंगाबाद: गंगापूर तालुक्यातील बुट्टेवाडगाव व परिसरामध्ये झालेले मुसळधार पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांची दिवाळीवर पावसाचे सावट असल्याने दिवाळी कशी साजरी करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे. बुट्टेवाडगाव येथील चव्हाण कुटुंबियांची माध्यमाने घेतलेल्या मुलाखातीत चिमुकल्या ऋषिकेशने पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याने दिवाळीला कपडे घेतले नाही.
उद्धव ठाकरेंनी कुटुंबियांशी संवाद साधला: तसेच शेतीच्या झालेल्या नुकसानीमुळे दिवाळी साजरा करणार नसल्याचा व्हिडीओ हा सोशल मीडियामध्ये महाराष्ट्रभर चांगलाच व्हायरलं झाला होता. बघता बघता मदतीचा ओघ वाढू लागला. ऋषिकेशला कपडे, फटाके, मिठाई अश्या विविध भेट वस्तू मिळाले आहे, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्या व्हिडीओची दखल घेत माजी खासदार चंद्रकांत खैरे उपजिल्हा प्रमुख कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या माध्यमातून दूरध्वनीद्वारे ऋषिकेश व कुटुंबियांशी संवाद साधला व झालेल्या नुकसानीतून सावरण्याचा धीर दिला.
शिक्षणाची जबादारी घेतली: ऋषिकेशच्या आजींनी त्याच्या शिक्षणाविषयीं उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली आहे. यावर उद्धव ठाकरे यांनी शब्द दिला, शिक्षणाची जबादारी ही आमची यालाच प्रतिसाद म्हणून तेथून जवळच श्री स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान गंगापूर संचलित श्री स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कुल सिद्धनाथ वाडगाव येथे संस्थेचे अध्यक्ष वाल्मिक सिरसाठ सचिव व शिवसेनेचे नगरसेवक डॉ आबासाहेब सिरसाट व प्रमोद महाजन यांनी उद्धव साहेबांनी दिलेला शिक्षणचा शब्द म्हणून ऋषिकेश व त्याच्या लहान भावाची बारावीपर्यंतचे शिक्षण देण्याची घोषणा केली आहे.
यांची उपस्थिती: शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे व चव्हाण कुटुंबियांनी श्री स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कुलचे आभार मानले आहे. या कुटुंबाची भेट सुद्धा उद्धव ठाकरे घेणार असल्याची चर्चा आहे. यावेळी माजी सभापती संतोष जाधव, नितीन खेडकर उपसरपंच ज्ञानेश्वर तिवाडे, चंद्रभान खेडकर, जीवन बैनाडे, महेश खेडकर, अनिल चव्हाण, भूषण राजपूत, प्रल्हाद खेडकर, शेषराव खेडकर आदी सह परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.