ETV Bharat / state

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर इम्तियाज यांचे औरंगाबादमध्ये जंगी स्वागत

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर इम्तियाज जलील यांचं औरंगाबादमध्ये जंगी स्वागत....कार्यकर्त्यांची औरंगाबाद विमानतळावर गर्दी...मतदार आपल्या बाजूनं असल्यानं विजय आपलाच, जलील यांचा विश्वास...

इम्तियाज जलील यांचे स्वागत करताना कार्यकर्ते
author img

By

Published : Mar 26, 2019, 8:14 PM IST

औरंगाबाद - लोकसभा मतदारसंघात एमआयएम पक्षाने आमदार इम्तियाज जलील यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली. उमेदवारी घोषित झाल्यानंतर इम्तियाज जलील विमानाने हैदराबादहून औरंगाबादेत दाखल झाले. यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. मतदार आपल्या बाजूने असल्याने, आपण नक्कीच विजय मिळवू, असा विश्वास आमदार जलील यांनी यावेळी बोलून दाखवला.

इम्तियाज जलील यांचे स्वागत करताना कार्यकर्ते

एमआयएम आमदार इम्तियाज जलील यांना खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी लोकसभेसाठी उमेदवारी घोषित केली. गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात एमआयएमने निवडणूक लढवावी, अशी इच्छा कार्यकर्त्यांची होती. बहुजन वंचित आघाडीची पहिली सभा औरंगाबादमध्ये पार पडली होती. त्यानंतर बहुजन वंचित आघाडीतर्फे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांना उमेदवारी घोषित करण्यात आली होती. मात्र, बी. जी. कोळसे-पाटील यांच्या नावाला अनेकांनी विरोध केला. औरंगाबादमध्ये एमआयएम पक्षाची मोठी ताकद आहे, त्यामुळे औरंगाबादेत एमआयएमने निवडणूक लढवावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी धरून ठेवली.

यासंदर्भात हैदराबादमध्ये बैठक झाली. यावेळी औरंगाबाद लोकसभा निवडणूक एमआयएम लढवणार, अशी घोषणा करण्यात आली. या बैठकीत आमदार इम्तियाज जलील यांचे नाव एक मुखाने उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले. त्यानंतर इम्तियाज जलील हे हैदराबादहून विमानाने औरंगाबादमध्ये दाखल झाले. तेव्हा औरंगाबाद विमानतळावर कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. माझ्यामागे मतदार असल्याने विजय निश्चित मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Intro:औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात एमआयएम पक्षाने आमदार इम्तियाज जलील यांना उमेदवारी दिली. उमेदवारी घोषित झाल्यानंतर इम्तियाज जलील विमानाने हैदराबादहुन औरंगाबादेत दाखल झाले, त्यावेळी त्यांचं कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केलं.Body:मतदार आपल्या बाजूने असल्याने आपण पण नक्कीच विजय मिळवू असा विश्वास आमदार यांच्या जलील यांनी बोलून दाखवला.Conclusion:एमआयएम आमदार इमतियाज जलील यांना खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी लोकसभेसाठी उमेदवारी घोषित केली. गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात एमआयएम निवडणूक लढवावी अशी इच्छा कार्यकर्त्यांचे होती. बहुजन वंचित आघाडीची पहिली सभा औरंगाबाद पार पडली होती. त्यानंतर बहुजन वंचित आघाडीतर्फे माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील यांना उमेदवारी घोषित करण्यात आली होती. मात्र बी जी कोळसे पाटील यांच्या नावाला अनेकांनी विरोध केला, इतकच नाही तर औरंगाबादेत एमआयएम पक्षाची मोठी ताकद आहे त्यामुळे औरंगाबादेत एमआयएमने निवडणूक लढवावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. त्यावर हैदराबादेत बैठक झाली आणि बैठकीमध्ये औरंगाबाद लोकसभा निवडणूक एमआयएम लढवणार अशी घोषणा करण्यात आली. इतकच नाही तर उमेदवार म्हणून आमदार इम्तियाज जलील यांचं नाव एक मुखाने मान्य करण्यात आलं. त्यानंतर इम्तियाज जलील हैदराबादहून विमानाने औरंगाबादेत दाखल झाले. औरंगाबाद विमानतळावर त्यांच्या कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केलं. यावेळेस यांच्या जली यांनी आपल्या भावना व्यक्त करत माझ्यामागे मतदार असल्याने विजय निश्चित मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. इतकंच नाही तर जो घटक राजकारणापासून वंचित राहिला होता त्याला या राजकारणाचा फायदा घेऊन राहू असा विश्वास देखील त्यांच्या जरी यांनी व्यक्त केला.

Byte - इम्तियाज जलील
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.