ETV Bharat / state

ऐन दुष्काळात टँकरच्या पाण्यावर फुलवली पैठणच्या शेतकऱ्याने मोसंबीची बाग

येणुनाना यांनी पैठण तालुक्यातील ढोरकीन येथे आपल्या अडीच एकर शेतातील मोसंबीची बाग वाचवण्यासाठी तब्बल 80 हजाराचे पाणी विकत घेतले आहे

author img

By

Published : Jun 25, 2019, 8:31 PM IST

ऐन दुष्काळात टँकरच्या पाण्यावर फुलवली पैठणच्या शेतकऱ्याने मोसंबीची बाग

औरंगाबाद - मराठवाड्यात सततच्या पडणाऱ्या दुष्काळाने शेतकऱ्याची वाईट परिस्थिती आहे. तर अनेकांच्या फळबागा पाण्याअभावी जळून गेल्या आहेत. पाणी नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी फळबागेवर कुऱ्हाड देखील चालवली आहे. मात्र, औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील एका शेतकऱ्याने जिद्दीने टँकरच्या पाण्यावर आपली फळबाग जगवली आहे. येणुनाना थोरात, असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

येणुनाना यांनी पैठण तालुक्यातील ढोरकीन येथे आपल्या अडीच एकर शेतातील मोसंबीची बाग वाचवण्यासाठी तब्बल 80 हजाराचे पाणी विकत घेतले आहे. तर त्यांनी उन्हाळ्यातील 4 महिने टँकरने आपल्या मोसंबीच्या बागेला पाणी दिले आहे. त्यामुळे ऐन दुष्काळात मोसंबीने तग धरला.

पैठण तालुका म्हटल की, सर्वांच्या डोळ्यासमोर पटकन जायकवाडी धरण येते. मात्र, धरण उशाशी आणि कोरड घशाशी, अशी अवस्था पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांची झाली आहे.

थोरात यांच्या अडीच एकरवरील मोसंबीच्या बागेत 400 झाडे आहेत. गेली 3 वर्षे बाग जपल्यानंतर मागील वर्षी चांगली मोसंबी हाताला लागेल, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र, झाडाला मोसंबी लागली आणि त्याच काळात पावसाने दडी दिल्याने मोसंबी वाचवणे अवघड झाले. झाडाला लागलेली मोसंबी तशीच ठेवली तर झाड देखील जळून जातील म्हणून मोसंबी लहान असतानाच ती थोरात यांनी काढून टाकली. त्यामुळे मोसंबीच्या झाडांना पाणी कमी लागू लागले. झाडे जगातील, असे वाटत होते. मात्र, पाऊस झाला नसल्याने जमिनीतील पाणी आटल, विहीर कोरडी पडली.

मोसंबीची झाडे जगवली नाही, तर 3 वर्षांची मेहनत वाया जाईल, या भीतीने झाडे जगवण्यासाठी येणुनाना यांनी झाडांना टँकरने पाणी देण्याचे ठरवले. नातेवाईकांकडून पैसे उधार घेऊन त्यांनी 4 महिन्यात 80 हजाराचे पाणी आपल्या मोसंबीच्या झाडांना दिले. आज झाडे जिवंत आहेत. मात्र, अद्याप म्हणावा तसा पाऊस न झाल्याने त्यांची चिंता वाढली आहे. लवकरात लवकर चांगला पाऊस आला तर टँकरच्या पाण्याची गरज पडणार नाही. शिवाय झाडांना चांगली फळधारणा होईल, अशी त्यांना अपेक्षा आहे.

Intro:मराठवाड्यात सतत पडणाऱ्या दुष्काळाने शेतकऱ्याचे कंबर्डे मोडले आहे. त्यात फळ उत्पादक शेतकऱ्यांना तर पाण्याअभावी फळबाग जगवणे अवघड झाले आहे. पाणी नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी फळबागेवर कुऱ्हाड देखील चालवली मात्र औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील एका शेतकऱ्याने जिद्दीने टँकरच्या पाण्यावर आपली फळबाग जगवली.

Body:पैठण तालुक्यातील ढोरकीन येथील येणुनाना थोरात यांनी अडीच एकर शेतात असलेली मोसंबीची बाग वाचवण्यासाठी उसनवारी करून तब्बल 80 हजारांच पाणी विकत घेतल. चार महिने टँकरच पाणी मोसंबीला दिल्याने ऐन दुष्काळात मोसंबीने तग धरलाय.

Conclusion:पैठण तालुका म्हणलं की जायकवाडी धरण सर्वांच्या दिल्यासमोर येत. मात्र धारण उशाशी आणि कोरड घशाशी अशी अवस्था पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांची झाली आहे. पैठण तालुक्यातील
ढोरकीन येथील येणुनाना थोरात यांच्या कडे मोसंबीची बाग आहे. अडीच एकरवरील या बागेत मोसंबीची 400 झाड आहेत. गेली तीन वर्षे बाग जपल्यानंतर मागीलवर्षी चांगली मोसंबी हाताला लागल अशी अपेक्षा येणूनाना यांना होती मात्र झाडाला मोसंबी लागली आणि त्याचकाळात पावसाने दडी दिल्याने मोसंबी वाचवणं अवघड झालं. झाडाला लागलेली मोसंबी तशीच ठेवली तर झाड देखील जळून जातील म्हणून मोसंबी लहान असतानाच ती काढून टाकली. त्यामुळे मोसंबीच्या झाडांना पाणी कमी लागू लागलं. झाड जगातील अस वाटत होतं मात्र पाऊस झाला नसल्याने जमिनीतील पाणी आटल, विहीर कोरडी झाली. मोसंबीची झाड जगवली नाही तर तीन वर्षांनी मेहनत वाया जाईल अशी भीती त्यांना वाटली. अखेर झाड जगवण्यासाठी येणुनाना यांनी टँकरने पाणी देण्याचं ठरवलं. नातेवाईकांकडून पैसे उधार घेऊन चार महिन्यात ऐंशी हजारांच पाणी त्यांनी आपल्या मोसंबीच्या झाडांना दिल. आज झाड जिवंत आहेत मात्र अद्याप म्हणावा तसा पाऊस न झाल्याने त्यांची चिंता वाढली आहे. लवकरात लवकर चांगला पाऊस आला तर टँकरच्या पाण्याची गरज पडणार नाही शिवाय झाडांना चांगली फळधारणा होईल अशी अपेक्षा त्यांना आहे. त्यामुळे आतातरी चांगला पाऊस येऊ दे अशी मनोकामना येणुनाना करत आहेत. ढोरकीन येथील येणुनाना थोरात यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी.
wkt
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.