ETV Bharat / state

Murder Mukundwadi : प्रेयसीच्या हत्येच्या महिन्याभरानंतर मिळाला प्रत्यक्षदर्शी साक्षीदार; प्रियकराला दोन दिवसाची पोलीस कोठडी - प्रियसीची हत्या

महिनाभरानंतर प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मिळाला असल्याने आकस्मिक मृत्यूच्या नोंदीचे खूनाच्या गुन्ह्यात रुपांतर झाले आहे. याप्रकरणी सरकारतर्फे मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप वाघ यांनी १३ मार्चला दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Murder Mukundwadi
Murder Mukundwadi
author img

By

Published : Mar 15, 2022, 10:29 AM IST

औरंगाबाद: प्रियकरानेच प्रेयसीचे डोकं जमीनीवर आपटून हत्या केल्याची घटना महिन्याभरापूर्वी घडली होती. या घटनेत महिनाभरानंतर प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मिळाला असल्याने आकस्मिक मृत्यूच्या नोंदीचे खूनाच्या गुन्ह्यात रुपांतर झाले आहे. याप्रकरणी सरकारतर्फे मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप वाघ यांनी १३ मार्चला दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कविता उर्फ जान्हवी सचिन वानखेडे (वेल्लूरे) असे मृताचे नाव आहे. तर अजमतखान उर्फ कयामत अनिसखान २७ (रा. शहाबाजार, चंपाचौक) असे आरोपीचे नाव आहे. दरम्यान मुकुंदवाडी परिसरात कविता उर्फ जान्हवी सचिन वानखेडे ही घटनेच्‍या चार ते पाच महिन्‍यांपूर्वी आरोपी अजमत खान ऊर्फ कयामत याच्‍यासोबत मुकुंदवाडी परिसरातील इच्‍छामनी हॉटेल पाठीमागील गल्लीत राहण्‍यासाठी आली होती. २ फेब्रुवारी रात्री साडेअकरा वाजेच्‍या सुमारास आरोपी अजमत खान याने मृत कविता ऊर्फ जान्‍हवीला घराजवळील मैदानातील एका झाडाजवळ उचलून नेत बेदम मारहाण केली. मारहाणीत कविता ऊर्फ जान्‍हवी गंभीर जखमी झाली. हा प्रकार मयत कविताच्‍या मैत्रणीने पाहिला व याची माहिती पोलिसांना दिली. कविताला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्‍यात आले. उपचार सुरु असतांना ६ फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजेच्‍या सुमारास कविताचा मृत्‍यू झाला. या प्रकरणात पोलिसांना प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मिळाल्याने आकस्मिक मृत्यूच्या नोंदीत बदल करून आरोपी विरूद्ध मुकुंदवाडी पोलीस ठाण्‍यात खूनाचा गुन्‍हा दाखल केला आला.

आरोपीला पोलीस कोठडी

आरोपीला सोमवारी दि. १४ रोजी न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील भागवत काकडे यांनी गुन्‍हा गंभीर असुन आरोपीने मयत कविताचा कोणत्‍या कारणासाठी खून केला याचा तपास करायचा आहे. आरोपीने गुन्‍हा करतेवेळी परिधान केलेले कपडे जप्‍त करायचे आहेत. गुन्‍ह्यात आरोपीला कोणी मदत केली काय याचा देखील तपास बाकी असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली. ही विनंती मान्य करत न्यायालयाने १६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.