ETV Bharat / state

..त्यामुळेच राज ठाकरे यांना ईडीची नोटीस - धनंजय मुंडे - paithan

सेना-भाजप म्हणजे काशीचा घाट झाला आहे. त्यात डुबकी मारली म्हणजे सर्व पवित्र होते असे दाखवले जात आहे. बबनराव पाचपुते आणि विजय गावित यांच्यावर अनेक आरोप आहेत. मात्र त्यांना देखील पक्षात घेण्यात आले आहे. मग त्यांच्या वरिल आरोपांचे काय झाले, असा सवाल मुंडे यांनी केला.

धनंजय मुंडे
author img

By

Published : Aug 19, 2019, 8:13 PM IST

औरंगाबाद- राज ठाकरे यांना ईडीची नोटीस मिळाली कारण त्यांनी लोकसभा निवडणुकीवेळी भाजप विरोधी भूमिका घेतली होती, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर केला आहे. जिल्ह्यातील पैठण तालुक्यातून शिवस्वराज्य यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झाली. यावेळी तालुक्यातील बाळापूर येथे जाहीर सभेत बोलताना मुंडे यांनी ही प्रतिक्रिया दिली.

धनंजय मुंडे

सेना-भाजप म्हणजे काशीचा घाट झाला आहे. त्यात डुबकी मारली म्हणजे सर्व पवित्र होते असे दाखवले जात आहे. बबनराव पाचपुते आणि विजय गावित यांच्यावर अनेक आरोप आहेत. मात्र त्यांना देखील पक्षात घेण्यात आले आहे. मग त्यांच्यावरिल आरोपांचे काय झाले, असा सवाल मुंडे यांनी केला. त्याचबरोबर मधुकर पिचड यांच्या दुसऱ्या बायकोने खोटे आदिवासी प्रमाणपत्र काढले. व त्या प्रमाणपत्रावर त्यांनी समृद्धी प्रकल्पाच्या जागेवर जमीन घेऊन पैसे कमावले म्हणून ते गेले, असा आरोप देखील धनंजय मुंडे यांनी केला.

शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून आम्ही सरकार उलथून टाकू

राज्याचे मुख्यमंत्री यात्रा काढत आहेत. ती यात्रा कश्यासाठी निघत आहे हा प्रश्न पडतो. मात्र ही यात्रा मी पुन्हा मुख्यमंत्री होणार हे सांगण्यासाठी आहे. शिवसेनेची 'जनआशीर्वाद' यात्रा ही युवराजाला मुख्यमंत्री करण्याबाबत सांगण्यासाठी आहे. शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून आम्ही सरकार उलथून टाकू. आम्ही शिवाजी महाराजांच्या स्वप्नातले महाराष्ट्र घडवण्यासाठी यात्रा करतो आहे, मुख्यमंत्री होण्यासाठी नाही, असा टोला धनंजय मुंडे यांनी जाहीर सभेत लावला.

कर्जमाफीचा ७० टक्के शेतकऱ्यांना फायदाच मिळाला नाही

कर्जमाफीची घोषणा करताना ऐतिहासिक घोषणा होईल असे म्हणाले आणि दिली मात्र अल्पशी कर्जमाफी. त्याचा ७० टक्के शेतकऱ्यांना फायदाच मिळाला नाही. सरकारने त्या योजनेला छत्रपतींचे नाव दिले. हा महाराजांचा आणि शेतकऱ्यांचा अवमान आहे. बेरोजगार तरुण अद्याप नौकारीची वाट पाहत आहेत. त्यांना आता कळाले की ती भरती म्हणजे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फोडून सेना-भाजपमध्ये प्रवेश करण्याची भरती होती, अशी मिश्किल टीका धनंजय मुंडे यांनी सरकारवर केली.

चंद्रकांत दादाला कोणी प्रश्न विचारू नये म्हणून कलम 144 लावला

चंद्रकांत दादा पाटलांचे वाईट हाल आहेत. कोणी फिरू देइना. कोणता शहाणा कलम १४४ लावील. तिथे काय दंगल होणार आहे? मात्र चंद्रकांत दादाला कोणी प्रश्न विचारू नये म्हणून कलम 144 लावला. मराठवाड्यात दुष्काळ आहे. कोणी आहे का आधार द्यायला?, असा प्रश्न देखील धनंजय मुंडे यांनी जाहीर सभेत उपस्थित केला.

Intro:राज ठाकरे यांना ईडीची नोटीस मिळाली कारण त्यांनी लोकसभेत भाजप विरोधी भाषण केल. असा आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी औरंगाबादच्या शिवस्वराज्य यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यातील जाहीर सभेत केला. पैठण तालुक्यातुन दुसऱ्या टप्याची सुरुवात करण्यात आली. त्यावेळी बाळापूर येथे जाहीर सभेला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हे उपस्थित होते. Body:सेना - भाजप म्हणजे काशीचा घाट झालाय. त्यात डुबकी मारली म्हणजे सर्व पवित्र झालं असं दाखवलं जात आहे. बबनराव पाचपुते आणि विजय गावित यांच्यावर अनेक आरोप आहेत त्यांना पक्षात घेतलं. मग आरोपांच काय झालं. मधुकर पिचड यांची दुसरी बायकोने खोट आदिवासी प्रमाणपत्र काढलं. आणि त्या प्रमाणपत्रावर समृद्धीच्या प्रकल्पाच्या ठिकाणी जागेवर जमीन घेऊन पैसे कमावले म्हणून ते गेले. असा आरोप देखील धनंजय मुंडे यांनी केला.Conclusion:शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून आम्ही सरकार उलथून टाकू. राज्याचे मुख्यमंत्री यात्रा काढत आहेत. ती यात्रा कश्यासाठी निघत आहे हा प्रश्न पडतो, मात्र ही यात्रा मी पुन्हा मुख्यमंत्री होणार हे सांगण्यासाठी आहे. शिवसेनेची जनआशीर्वाद यात्रा युवराज मुख्यमंत्री होणार सांगण्यासाठी आहे. मात्र आम्ही शिवाजी महाराजांच्या स्वप्नातलं महाराष्ट्र घडवण्यासाठी करतोय मुख्यमंत्री होण्यासाठी नाही. असा टोला धनंजय मुंडे यांनी जाहीर सभेत लावला. कर्जमाफीची घोषणा करताना ऐतिहासिक होईल असं म्हणाले आणि दिली मात्र दीड लाखांची त्याचा 70 टक्के शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळाला नाही. त्या योजनेला छत्रपतींच नाव दिल. हा महाराजांचा आणि शेतकऱ्यांचा अवमान आहे. बेरोजगार तरुण अद्याप नौकारीची वाट पाहत आहेत. त्यांना आता कळाल की ती भरती सेना - भाजप मध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फोडून भरती करण्याची होती. अशी मिश्किल टीका धनंजय मुंडे यांनी केली. चंद्रकांत दादा पाटलांचे वाईट हाल आहेत. कोणी फिरू देईनात. कोणता शहाणा कलम 144 लावील. तिथे काय दंगल होणार आहे का? मात्र चंद्रकांत दादाला कोणी प्रश्न विचारू नये म्हणून कलम 144 लावला. मराठवाड्यात दुष्काळ आहे. कोणी आहे का आधार द्यायला असा प्रश्न देखील धनंजय मुंडे यांनी जाहीर सभेत उपस्थित केला.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.