ETV Bharat / state

शेततळ्यातील पाणी कमी झाल्याने माशांचा तडफडून मृत्यू

यंदा भीषण दुष्काळ पडल्याने परिसरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यात गेल्या महिनाभरापासून उन्हाचा तडाखा वाढल्याने शेततळ्यातील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होवुन शेततळ्याने तळ गाठला. शेततळ्यातील पाणी कमी झाल्याने माशांचा तडफडून मृत्यू झाल्याची घटना पैठण तालुक्यातील आडूळ येथे घडली.

पाणी कमी झाल्याने माशांचा तरफडून मृत्यू
author img

By

Published : May 4, 2019, 1:18 PM IST

औरंगाबाद - दुष्काळाची दाहकता दिवसेदिवस वाढत चालली आहे. उन्हामुळे शेततळ्यातील पाणी कमी झाल्याने माशांचा तडफडून मृत्यू झाल्याची घटना पैठण तालुक्यातील आडूळ येथे घडली.

शेततळ्यातील पाणी कमी झाल्याने माशांचा तरफडून मृत्यू

राधाकिसन बाबुराव वाघ यांची आडुळ शिवारात शेती आहे. त्यांनी गट क्रमांक 75 मध्ये शेततळे तयार केले असून, या शेततळ्यात जुन 2018 मध्ये माशांचे मोठ्या प्रमाणात बीज सोडले होते. दरवर्षी ते माशांचे उत्पन्न घेत असल्याने यंदाही चांगले उत्पन्न होईल अशी आशा राधाकिसन यांना होती. मात्र, यंदा भीषण दुष्काळ पडल्याने परिसरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यात गेल्या महिनाभरापासून उन्हाचा तडाखा वाढल्याने शेततळ्यातील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होवुन शेततळ्याने तळ गाठला. शेततळ्यात जे जेमतेम पाणी शिल्लक राहिले त्यातील सर्व मासे मरण पावले. यात राधाकिसन वाघ यांचा जवळपास ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. आधीच दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना आपली शेती वाचवण्यासाठी धडपड करावी लागत आहे. त्यात सुरु केलेला जोडधंदा देखील निसर्गाच्या अवकृपेने टिकवणे अवघड होत असल्याने बळीराजा हतबल झाला आहे.

Intro:दुष्काळाची दाहकता दिवसंदिवस वाढत चालली आहे. उन्हामुळे शेततळ्यात पाणी कमी झाल्याने माश्यांचा तडफडून मृत्यू झाल्याची घटना औरंगाबादेत घडली. Body:औरंगाबाद जिल्ह्याच्या पैठण तालुक्यातील आडूळ येथील शेतकरी राधाकिसन बाबुराव वाघ यांची आडुळ शिवारात शेती आहे. त्यांनी गट क्रमांक 75 मध्ये शेततळा तयार केलं असून या शेततळ्यात जुन 2018 मध्ये मासेंचे मोठ्या प्रमाणात बीज सोडले होते. Conclusion:दरवर्षी ते मासेंचे उत्पन्न घेत असल्याने यंदा ही चांगले उत्पन्न होईल अशी आशा राधाकिसन यांना होती. मात्र यंदा भीषण दुष्काळ पडल्याने परिसरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. त्यात गेल्या महिनाभरापासून उन्हाचा तडाखा वाढल्याने शेततळ्यात राहिलेल्या पाण्याचे मोठ्याप्रमाणात बाष्पीभवन होवुन शेततळ्याने तळ गाठला. आणि शेततळ्यात जे जेमतेम पाणी शिल्लक राहिलेल्या पाण्यात सर्व मासे मरण पावले. यात राधाकिसन वाघ यांचा जवळपास पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले.आधीच दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना आपली शेती वाचवण्यासाठी धडपड करावी लागत आहे. त्यात सुरुकेले जोड धंदे देखील निसर्गाच्या अवकृपेने टिकवणं अवघड होतं असल्याने बळीराजा हतबल झालाय.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.