ETV Bharat / state

लॉकडाऊनमुळे सामाजिक संस्था अडचणीत; निराधारांचा सांभाळ करणे झाले अवघड - Lockdown Orphanage

औरंगाबाद येथील अनेक संस्थांना मिळणारी खासगी देणगी बंद झाली आहे. त्यात सरकारी अनुदान काही निवडक संस्थानाच दिल जात त्यामुळे आता संस्थेत असलेल्या लहान मुलांना दोनवेळचे अन्न देणे कठीण झाले असल्याचं शोभना शिक्षण संस्था संचालित निराधार निराश्रित बालकाश्रमचे अध्यक्ष रमेश सरपते यांनी सांगितले.

Lockdown  Orphanage
लॉकडाऊनमुळे सामाजिक संस्था अडचणीत; निराधारांचा सांभाळ करणे झाले अवघड
author img

By

Published : May 22, 2020, 5:13 PM IST

औरंगाबाद - कोरोनामुळे अनेक उद्योगधंदे उद्ध्वस्त झाल्याचे पाहायला मिळत असताना दुसरीकडे निराधारांचा आधार देणाऱ्या सामाजिक संस्था देखील अडचणीत आल्याचे पाहायला मिळत आहे. दात्यांनी दिलेल्या मदतीवर आजवर काम करणाऱ्या सामाजिक संस्थांकडे दात्यांनी पाठ फिरवल्याने संस्थेत असलेल्या निराधारांचा सांभाळ करण्यासाठी रेशनदेखील उपलब्ध राहीले नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे सामाजिक संस्था हतबल होत असून, पुढील काळात संस्थेचे अस्तित्व नामशेष होण्याच्या भीती संस्थाचालकांनी उपस्थित केली आहे.

औरंगाबाद येथील अनेक संस्थांना मिळणारी खासगी देणगी बंद झाली आहे. त्यात सरकारी अनुदान काही निवडक संस्थानाच दिल जात त्यामुळे आता संस्थेत असलेल्या लहान मुलांना दोनवेळचे अन्न देने अवघड झाले असल्याचं शोभना शिक्षण संस्था संचालित निराधार निराश्रित बालकाश्रमचे अध्यक्ष रमेश सरपते यांनी सांगितले.

लॉकडाऊनमुळे सामाजिक संस्था अडचणीत; निराधारांचा सांभाळ करणे झाले अवघड
औरंगाबादच्या सिडको परिसरात शोभना शिक्षण संस्था संचालित निराधार निराश्रित बालकाश्रम हे अनाथालय आहे. ज्यामध्ये 30 निराधार मुलांचा संभाळ केला जातो. महिला व बालकल्याण समिती मार्फत या संस्थेत निराधार मुलांना पाठवले जाते. तिथे त्यांचे पालन पोषण केले जाते. सरकारचे कुठलेही अनुदान न घेता ही संस्था खासगी देणगीदारांच्या मिळणाऱ्या मदतीवर या मुलांचा सांभाळ केला जातो. अनेक वर्षांपासून निराधारांचा आधार असलेल्या या संस्थेलाच आता कोणाचा आधार मिळेना अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. दोन महिन्यांपासून कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहेत.

येण्या-जाण्याचे मार्ग बंद झाल्याने सामाजिक संस्थांना मिळणाऱ्या मदतीचे मार्ग देखील बंद झालेत. त्यामुळे संस्थेच्या खात्यात असलेले पैसे संपले, स्वयंपाक घरातील डबे मोकळे व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता मदतीची खरी गरज निर्माण झाल्याचे मत संस्थेचे अध्यक्ष रमेश सरपते यांनी व्यक्त केलं. सरकारी मदत मिळाली तर संस्थेतील मुलांचे पालन पोषण करणे सोपे झाले असते, मात्र सरकारी मदत काही निवडक संस्थानाच मिळते. त्यामुळे खासगी देणगीदारांवर चालणाऱ्या आमच्या सारख्या संस्था आता अडचणीत आल्या आहेत. इमारतीचे भाडे, रोज लागणारे साहित्य असा महिन्याकाठी तीन लाखांपर्यंत खर्च करावाच लागतो. त्यामुळे मदत करू शकणाऱ्या दात्यांनी मदतीसाठी पुढे यायला हवं तरच या निराधार मुलांचा संभाळ आम्ही करू शकतो, अस मत शोभना शिक्षण संस्था संचालित निराधार निराश्रित बालकाश्रमचे अध्यक्ष रमेश सरपते यांनी व्यक्त केले.

लहान मूल असल्याने दोनवेळचे जेवण देऊन भागात नाही सकाळी उठल्यापासून लागणाऱ्या टूथपेस्ट पासून ते रात्री झोपेपर्यंत अनेक छोटछोट्या गोष्टी लागत राहतात. मात्र आज त्या गोष्टी देऊ शकत नसल्याने अनेकवेळा खंत वाटत असल्याची भावना अधिक्षीका दीपाली मल्हाणे यांनी व्यक्त केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.