वैजापूर (औरंगाबाद) - वैजापूर तालुक्यातील बायगाव शिवारात ( Baigaon village in Vaijapur Taluk ) विजेचे तार बैलगाडीवर पडून ( Electric Wires Falll On Bullock Cart ) दोन सख्ख्या भावांचा मृत्यू ( Death of two brothers ) झाला आहे. सुसाट सुटलेल्या जोरदार वाऱ्यामुळे विजेचे तार बैलगाडीवर पडून त्या दोन सख्ख्या भावांसह एका बैलाचाही जागेवर मृत्यू ( Bull Dead ) झाला आहे. ही धक्कादायक घटना तालुक्यातील बायगाव शिवारात बुधवारी (ता.२०) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली.
परिसरात हळहळ व्यक्त - साहेबराव गणपत पाटील चेळेकर (वय ७० ), लहान बंधू बाबुराव गणपत पाटील चेळेकर (वय ५७) अशी मृत शेतकऱ्यांची नावे आहेत. हे दोन्ही भाऊ बायगाव येथील रहिवासी आहेत. या घटनेविषयी अधिक माहिती अशी की, चेळेकर बंधू बायगाव शिवारातील देवगाव रसत्यावर असलेल्या वस्तीवर राहत होते. बुधवारी सायंकाळी जोरात वारा सुटल्याने विजेच्या खांबावरील वायर तूटून बैलावर पडली त्यामुळे बैलाचा जागेवरच तडफडून मृत्यू झाला. त्यानंतर चेळेकर बंधू बैलाजवळ आले असता त्यांचा विज तारांना स्पर्श झाल्याने दोन्ही भाऊ गंबीर जखमी झाले. तिथे उभे असलेल्या लोकांनी चेळेकर बंधुना देवगाव रंगारी येथे उपचारासाठी नेले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. दरम्यान, ऐकाच घरातील दोन व्यक्तीवर काळाने झडप घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी शिऊर पोलिसांनी पाहणी केली व पुढील तपास करत आहे.
अमरावतीत एकाचा मृत्यू - अमरावती जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. त्यात वीज अंगावर पडल्याने निंबोली येथील पद्माकर वानखडे वय (45) यांचा मृत्यू झाला. शेतात काम करत असताना त्यांच्या अंगावर वीज पडली, या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. वानखडे यांच्या पश्चात 2 लहान मुली पत्नी असा परिवार आहे.
हेही वाचा - Teacher Recruitment : शिक्षक भरती एमपीएससी मार्फत..? शिक्षण आयुक्तालयाकडून शासनाला पत्र