औरंगाबाद - आजपासून जिल्ह्यातील बाजारपेठा उघडण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. शासनाने कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 च्या इतर सर्व सक्षम तरतुदींसह साथीच्या रोग अधिनियम, 1897 मधील कलम 2 अन्वये हा निर्णय घेण्यात आला.
सुधारित आदेशानुसार, कोरोनाच्या रुग्णांची साखळी तोडणे (Break the Chain) सुधारित अटी व शर्ती अंमजबजावणीस्तव विविध आदेश निर्गमित केलेले आहे. त्यात 16 एप्रिल आणि 12 मे 2021मधील इतर सर्व बाबी कायम ठेवण्यात आलेल्या असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. औरंगाबाद शहर व जिल्हा क्षेत्राकरिता दिनांक 1 जून 2021 रोजीचे सकाळी 7 वाजेपासून 15 जून 2021 रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत खालील बाबी हया संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्यासाठी (शहरासह) लागू करण्यात येत आहेत.
हेही वाचा - शंकरबाबा पापळकरांकडून दिवंगत मा. गो. वैद्य यांना डी. लिट. पदवी अर्पण; अमरावती विद्यापीठाकडून झाला होता सन्मान
असे असतील नवीन नियम -
- अत्यावश्यक सेवा - औरंगाबाद महानगरपालिकासह संपूर्ण जिल्ह्यात कोविड-19 च्या प्रसारास प्रतिबंधित करण्यासाठी दिनांक 16 एप्रिल आणि 12 मे 2021 रोजीच्या आदेशातील अत्यावश्यक सेवा (Essential Category) मधील नमूद दुकाने ही आठवड्यातील सर्व दिवस रोजी सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहतील.
- बँक - औरंगाबाद महानगरपालिकासह संपूर्ण जिल्ह्यात सर्व बँका कामाचे सर्व दिवस (Working Days) सुरू राहतील.
- अत्यावश्यक दुकानाव्यतिरिक्त इतर दुकाने (Non Essential Shops) - औरंगाबाद महानगरपालिकासह संपूर्ण जिल्हयात अत्यावश्यक दुकानाव्यतिरिक्त इतर दुकाने (Non Essential Shops-Stand alone shops and not inside Shopping Centres/Malls) सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहतील. सर्व Shopping Centres/मॉल बंद राहतील.
- घरपोच सेवा सुविधा - रेस्टॉरंट/हॉटेल,,बार व मद्य विक्रीची दुकाने ही फक्त पार्सल / घरपोच सेवेसाठी दिनांक 16 एप्रिल आणि 12 मे 2021 रोजीच्या आदेशानुसार सुरू राहतील.
- औरंगाबाद महानगरपालिकासह संपूर्ण जिल्ह्यात ई-कॉमर्स मार्फत अत्यावश्यक वस्तु व सेवा तसेच, अत्यावश्यक व्यतिरिक्त (Essential / Non-essential) यांची घरपोच सेवा (Home Delivery) सुरू करण्यात मुभा देण्यात आली आहे.
- वैद्यकीय सेवा - अत्यावश्यक कारण : औरंगाबाद महानगरपालिकासह संपूर्ण जिल्ह्यात दररोज दुपारी 3 वाजेनंतर वैद्यकीय सेवा व इतर अत्यावश्यक कारण (Valid Reason)/ अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना घराबाहेर पडण्यास संपूर्णपणे प्रतिबंध (संचारबंदी) राहील. तसेच, घरपोच सेवा देण्यास यापूर्वी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशानुसार परवानगी राहील.
- शासकीय / निमशासकीय कार्यालये - औरंगाबाद महानगरपालिकासह संपूर्ण जिल्ह्यात सर्व शासकीय कार्यालये (अत्यावश्यक/कोरोनाविषयक कामकाज करणाऱ्या कार्यालयाव्यतिरिक्त ) 25% अधिकारी/कर्मचारी उपस्थितीत सुरू राहतील.
- कृषी आस्थापना - कृषि संबधित दुकाने आणि त्यांच्याशी संबधित आस्थापना (बी-बियाणे, खते, उपकरणे व त्यांच्याशी निगडीत देखभाल व दुरुस्ती सेवा इत्यादी) तसेच, कृषी उत्पन्न बाजार समिती हे आठवडयातील सर्व दिवस सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहतील.
- मालवाहतुक इ. - मालवाहतूक व मालाचा पुरवठा संबधित दुकानदार/आस्थापनेस करण्याकरिता वेळेचे कोणतेही निर्बंध नाहीत. मात्र, अशा दुकानदार/आस्थापना यांनी कोणत्याही परिस्थितीत माल साठवणूक करतांना या कालावधीत मालाची विक्री करू नये. मालाची विक्री होत असल्याचे आढळून आल्यास संबधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- वरील आदेशाव्यतिरिक्त इतर बाबींसाठी या कार्यालयाचे दि.14/04/2021, दि.16/04/2021, दि.18/04/2021, दि.20/04/2021, दि.22/04/2021, दि.30/04/2021, दि.14/05/2021 व दि.16/05/2021 रोजी निर्गमित केलेले आदेश/मार्गदर्शक सूचना लागू राहतील.
- ज्या आस्थापना/दुकाने दुपारी 2पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिलेली आहे. त्यांनी दुपारी 2.30पर्यंत अथवा तत्पूर्वी अनिवार्य सर्व हिशोब व इतर कार्यवाही पूर्ण करुन दुकाने/आस्थापना बंद करावी. यासंबंधी उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास सदरील दुकाने/आस्थापना कोरोना संपेपर्यंत सील (Seal) करण्यात येतील याची नोंद घ्यावी.
- यापूर्वी कोरोनामध्ये नियमबाह्य कृतीबद्दल बंद (Seal) केलेल्या आस्थापना त्यांची सुनावणीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच उघडल्या जातील. या सुनावणीचे अधिकार कामगार विभागाचे सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना राहतील.
या आदेशाची कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा संघटना यांनी अंमजबजावणी करण्यास टाळाटाळ करू नये. अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीत आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 चे कलम 51 ते 60 व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 तसेच साथरोग कायदा 1897 अन्वये दंडनीय/कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहील, असेही जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.