ETV Bharat / state

कोरोनामुळे ऑक्सिजनच्या मागणीत वाढ, घरी सिलेंडर नेणाऱ्यांच्या संख्येतही भर - औरंगाबाद कोरोना संसर्गात वाढ

रुग्णालयात मागणी वाढत असताना घरात ऑक्सिजन सिलेंडर घेऊन उपचार घेणाऱ्यांची संख्या देखील पूर्वीपेक्षा 70 टक्क्यांनी वाढली आहे. जिथे एका एजन्सीमधून सात ते आठ जण उपचारासाठी सिलेंडर घेत असत, तिथे आता 50 ते 60 रुग्ण घरी सिलेंडर मागवत असल्याचे समोर आले आहे. अस्थमा, आणि श्वसनाचे त्रास होत असलेले घरी उपचार घेण्यास शक्य असणारे रुग्ण आधी ऑक्सिजन सिलेंडर मागवत होते. त्यामध्ये कोरोनाचे कमी लक्षणे असलेले मात्र घरी उपचार घेणाऱ्या रुग्णांची त्यात भर पडल्याचे दिसून आले आहे.

कोरोनामुळे ऑक्सिजनच्या मागणीत वाढ
कोरोनामुळे ऑक्सिजनच्या मागणीत वाढ
author img

By

Published : Sep 19, 2020, 8:06 PM IST

औरंगाबाद - कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. शहरातील सर्वच रुग्णालयात बेड उपलब्ध नाहीत. त्यामुळे रुग्णांना प्रतीक्षा यादीत राहण्याची वेळ आली आहे. त्यात ऑक्सिजनची मागणी वाढली असून त्या मानाने पुरवठा कमी पडत असल्याचे शहरात दिसून येत आहे.

कोरोनामुळे ऑक्सिजनच्या मागणीत वाढ, घरी सिलेंडर नेणाऱ्यांच्या संख्येतही भर
औरंगाबाद शहरात तीन कंपन्यांतर्फे ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. मुख्य रुग्णालयांना रोज 27 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज असताना 26 मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध होत आहे. त्यामुळे सद्यस्थितीत 1 हजार मेट्रिक टन ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. पूर्वी पुण्याहून काही प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होत असे मात्र तिकडेही ऑक्सिजनची मागणी वाढल्याने तो पुरवठा आता होत नाहीये त्यामुळे रुग्णांची गैरसोय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सर्वच रुग्णालयात बेड शिल्लक नसल्याचे चित्र आहे. त्यात ऑक्सिजनची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. श्वसनाचे त्रास असलेल्या रुगणांवर उपचार करण्यासाठी ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. शहराला औद्योगिक वसाहतीतील ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या तीन कंपन्यांकडून ऑक्सिजन पुरवले जाते. ज्यामध्ये रुग्णालयांसह उद्योगांना हा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनामुळे रुग्णसंख्या वेगात वाढत आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 30 हजारांच्या घरात असल्याने रुग्णालयात नवीन रुग्णांना जागा मिळणे अवघड झाले आहे. त्यात वयोवृद्ध रुग्ण, आजार असलेल्या रुग्णांना कोरोनामुळे त्रास होत अशा रुग्णांची प्रकृती गंभीर होण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यात ऑक्सिजन कमी पडत असल्याने रुग्ण दगावल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला होता. शहराच्या क्षमतेपेक्षा 1 हजार मेट्रिक टन ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे.

रुग्णालयात मागणी वाढत असताना घरात ऑक्सिजन सिलेंडर घेऊन उपचार घेणाऱ्यांची संख्या देखील पूर्वीपेक्षा 70 टक्क्यांनी वाढली आहे. जिथे एका एजन्सीमधून सात ते आठ जण उपचारासाठी सिलेंडर घेत असत, तिथे आता 50 ते 60 रुग्ण घरी सिलेंडर मागवत असल्याचे समोर आले आहे. अस्थमा, आणि श्वसनाचे त्रास होत असलेले घरी उपचार घेण्यास शक्य असणारे रुग्ण आधी ऑक्सिजन सिलेंडर मागवत होते. त्यामध्ये कोरोनाचे कमी लक्षणे असलेले मात्र घरी उपचार घेणाऱ्या त्यात रुग्णांची भर पडल्याचे दिसून आले आहे. या रुग्णांमुळे ऑक्सिजन सिलेंडरची मागणी देखील वाढली आहे. पुढील काही दिवसांमध्ये कोविड रुग्णालयात ऑक्सिजन बेड वाढवण्याची तयारी मनपा करत आहे. मात्र बेड जरी वाढवले तरी ऑक्सिजन आणणार कुठून हा प्रश्न निर्माण होतो आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.