ETV Bharat / state

NEET Examination Fraud : नीट परीक्षेत विद्यार्थ्याच्या दोन गुणपत्रिका, न्यायालयाने दिले सायबर चौकशीचे आदेश - two mark sheets of student

वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेण्यासाठी आणि नीटची परिक्षा पास व्हावे यासाठी विद्यार्थी जिवाचे रान करतात. मात्र औरंगाबाद येथ नीटची परिक्षा देणाऱ्या एकाच विद्यार्थ्याच्या दोन वेगवेगळ्या गुणपत्रिका ( student were found in NEET examination) समोर आल्याने गोंधळ उडाला (NEET Examination Fraud) आहे. तर, त्या विद्यार्थ्याने देखील न्यायालयात धाव घेत, याचिका दाखल (court ordered a cyber probe as two mark sheets) केली आहे.

NEET Examination Fraud
न्यायालयाने दिले सायबर चौकशीचे आदेश
author img

By

Published : Dec 2, 2022, 8:01 PM IST

औरंगाबाद : वैद्यकीय प्रवेशासाठी महत्त्वाच्या असलेल्या नीट परीक्षेत एकाच विद्यार्थ्याची दोन वेगवेगळे गुण असलेली गुणपत्रिका ( student were found in NEET examination) समोर आल्याने शिक्षण क्षेत्रात चालले काय? असा प्रश्न उभा झाला आहे. याप्रकरणी विद्यार्थ्याने न्यायालयात धाव घेतली. विद्यार्थ्याच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने, प्रवेश परीक्षा आयोजित करणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीला (NEET Examination Fraud) याप्रकरणी सायबर सेल कडे तपास देणे आणि सायबर सेलने तपास करून जबाबदार असणाऱ्यावर गुन्हा दाखल करणे, असे आदेश (court ordered a cyber probe as two mark sheets) दिले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करतांना अॅड. सिद्धेश्वर ठोंबरे

एकाच विद्यार्थ्याचे दोन गुण पत्रक : याचिकाकर्ता विद्यार्थ्याने बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी युजी नीट 2022 परीक्षा दिली. यात प्रवेश पत्र आणि इतर कागदपत्रांवर त्याला एक अर्ज क्रमांक देण्यात आला. या परीक्षेत त्याला 576 गुण मिळाले, तशी अधिकृत गुणपत्रिका वेबसाईटवर प्रकाशित देखील झाली. त्या अर्जावर त्याने वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश करीत अर्ज केला. मात्र फेरी अखेर त्याला नीट परीक्षेत केवळ 147 गुण असल्याचं सांगत प्रवेश नाकारण्यात आला. त्यावेळी अधिकृत वेबसाईटवर त्याला 147 गुण मिळायचं दिसून आलं. दोन्ही गुण पत्रिकेवर नाव, फोटो आणि स्वाक्षरी त्याची स्वतःची होती, असं असलं तरी प्रवेश अर्ज क्रमांक वेगवेगळा होता. त्यामुळे विद्यार्थ्याने न्यायालयात दाद मागितली.

याआधी देखील झाल्या आहेत अशा घटना : देशात असे प्रकार अनेक वेळा घडले आहेत. एकाच विद्यार्थ्याचे दोन वेगवेगळे गुणपत्रक जाहीर करण्यात आले. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. या प्रकरणात अर्ज क्रमांक वेगवेगळ्या असल्याने हे प्रकरण आता तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याप्रकरणी सायबर विभागाने तपासणी करून तसा अहवाल तयार करणे आणि त्यानंतर संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा, असे निर्देश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. या प्रकरणामुळे अनेक विद्यार्थ्यांना न्याय मिळेल असा विश्वास याचिकाकर्ते वकील अॅड. सिद्धेश्वर ठोंबरे यांनी व्यक्त केला. NEET Examination Fraud

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.