औरंगाबाद - संत शिरोमणी गुरू आरोग्य केंद्र येथून कोवीड लसीकरणाला सुरुवात झाली. शहरातील एका केंद्रावर १०० जणांना लस दिली जाणार आहे. आज ५०० आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. आज सकाळी अकरा वाजता पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत या मोहिमेला सुरुवात झाली. शहरातील पाच केंद्रावर लसीकरण मोहीम असल्याची माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य अधिकारी निता पाडळकर यांनी दिली.
हेही वाचा - औरंगाबादेत ग्रामपंचायत मतदानाला सुरुवात; ११ हजार ४९९ उमेदवार रिंगणात
पहिली लस डॉ. राजेंद्र वैद्य यांना
लसीकरणासाठी शहरातील आरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. नोंदणीकृत आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये बाल रोग तज्ज्ञ राजेंद्र वैद्य यांना पहिली लस देण्यात आली. यावेळी लस घेतल्यावर कुठलाही त्रास झाला नाही. नागरिकांना लस देण्यात यईल तेव्हा त्यांनी घ्यावी, असे आवाहन वैद्य यांनी केले.
२४ हजार ३०२ आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी
लसीकरणासाठी पालिकेच्या नियंत्रण कक्षात २४ हजार ३०२ आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली आहे. यासाठी २० हजार डोस प्राप्त झाले आहेत. एका बॉटलमध्ये पाच मिली लसीची मात्रा आहे. यातील दहा टक्के लस विविध कारणांमुळे वाया जाईल. ९० टक्के लस ९ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्याचे नियोजन आहे. लस दिलेल्या कर्मचाऱ्यांवर महापालिका लक्ष ठेवणार आहे. त्यांची परिस्थिती बघून दुसरी लस देणार असल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 27 वा नामविस्तार दिन उत्साहात