औरंगाबाद - बोकुड जळगावात दोन गटात तुफान राडा झाला आहे. जागेच्या वादावरून दगड विटांच्या सहाय्याने ही हाणामारी झाल्याची घटना सोमवारी सकाळच्या सुमारास घडली आहे. या घटनेत दोन महिलांसह सहा जण जखमी झाले आहेत.
बिडकीन येथील बोकुड जळगाव गावाजवळील एका जागेच्या जुन्या वादातून दोन कुटुंबांमध्ये वाद सुरू झाला. वाद विकोपाला गेल्याने तुंबळ मारहाण सुरू झाली. जवळच असलेल्या वीट भट्टीच्या विटा आणि दगड एकमेकांवर मारायला सुरुवात झाली. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला. विटा दगड लागल्याने महिलांसह काही जण यात जखमी झाले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करत या प्रकरणात बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे., जखमींवर बिडकीन रुग्णालयात उपचार करण्यात असून घटनेचा तपास पोलीस करत आहेत.