ETV Bharat / state

पहिले दाऊदचा बाप काढायचे, मग नवाज शरीफचा, आता हिंदुत्व गेल्याने आमचा बाप काढावा लागतो..

author img

By

Published : Nov 12, 2020, 8:55 PM IST

Updated : Nov 12, 2020, 9:13 PM IST

दसरा मेळाव्यात म्हणतात रावसाहेब दानवेचा बाप दिल्लीत असेल, आमचा मुंबईत आहे. पहिले दाऊदचा बाप काढत होते, मग नवाज शरीफचा काढला आता हिंदुत्व गेलं, म्हणून आता आमचे बाप काढावे लागत आहेत, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा दानवे यांनी समाचार घेतला. उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळवाव्यात दानवेंवर टीका केली होती त्याला आज प्रतिउत्तर दानवे यांनी दिले.

औरंगाबाद
औरंगाबाद

औरंगाबाद - दिवाळीच्या रणधुमाळीत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राजकीय फटकेबाजीची आतिषबाजी ऐकायला मिळाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणाचा बाप काढू शकत नाही, त्यामुळे त्यांनी माझा बाप काढला, अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जाहीर भाषणात केली.

सभेत बोलताना केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे भाजप उमेदवार शिरीष बोराळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. त्यानंतर भाजपचा मराठवाडा विभागीय पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, हरिभाऊ बागडे, खासदार भागवत कराड, संभाजी पाटील निलंगेकर यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत बिहार निवडणुकीप्रमाणे पदवीधर निवडणूक जिंकून जल्लोष करण्याच्या सूचना दिल्या.अमेरिका निवडणुकीची तुलना बिहार निवडणुकीशी अमेरिकेत निवडणूक झाली तिकडे ट्रम्प पडले पण बिहार निवडणूक बघा आपण जिंकलो मोदी जिंकले, बघा करिष्मा, त्यामुळं कामाला लागा, पदवीधर मतदारसंघात पण आपणच जिंकू, असे विधान करत केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी अमेरिकन निवडणुकीची तुलना बिहार निवडणुकीशी केली. तुमचं सरकार तुमची जबाबदारी..देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, त्यावेळी आम्ही पंचनामे न करता मदत केली, आणि नशीब बदलले, हे मुखयमंत्री झाले, हे घराबाहेरच पडेना, काय करावे अस म्हणत माझं कुटुंब माझी जबाबदारीची खिल्ली उडवली. जो कुणी मदत मागायला जातो त्याला म्हणतात तुमचा प्रश्न तुमची जबाबदारी, काय म्हणावं. काही झालं की केंद्रकडे मदत बाकी आहे असं म्हणतात. आता आम्ही म्हणतो तुमचं राज्य तुमची जबाबदारी.. अस म्हणत मुख्यमंत्र्यांना जोरदार टोलेबाजी त्यांनी केली.यांना माझा बाप काढावा लागला... तुम्ही कुणाच्या इशाऱ्यावर चालता, तुमचा गॉड फादर कोण आहे? तुम्हीच सांगा. असे म्हणत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना टोला लगावला. दसरा मेळाव्यात म्हणतात रावसाहेब दानवेचा बाप दिल्लीत असेल, आमचा मुंबईत आहे. पहिले दाऊदचा बाप काढत होते, मग नवाज शरीफचा काढला आता हिंदुत्व गेलं, म्हणून आता आमचे बाप काढावे लागत आहेत, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा दानवे यांनी समाचार घेतला. उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळवाव्यात दानवेंवर टीका केली होती त्याला आज प्रतिउत्तर दानवे यांनी दिले.निवडणुकीच्या आधी आपल्या पक्षातील पंक्चर काढा..पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत कामाला लागत असताना रावसाहेब दानवे यांनी सायकलचा पंचर कस काढतात याचा किस्सा कार्यकर्त्यांना सांगितला. त्यावेळी सभागृहात सर्वत्र हशा पसरला. जसं सायकलचा पंचर काढल्यावर आपण वाल चेक करतो. तसंच या निवडणुकीच्या आधी आपल्या पक्षात कोणता वॉल लीक आहे का? हे तपासून घ्या. कारण आता निवडणुकीच्या आधी पक्षात कुठलाच वॉल लिक राहायला नाही पाहिजे. आणि आपलाच उमेदवार निवडून आला पाहिजे अशी टोलेबाजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली.अपघाताने पराभव होतो, विजय हा अपघात नसतो..लोक म्हणतात दानवेसाहेब अर्ज भरायला आले की, विजय मिळतो. प्रीतमताईंच्या वेळी दानवे आले, नेमके माझ्याच वेळी आले नाहीत, माझी पंचाईत झाली. यापुढे घेऊन जाईन यांना नक्की, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्याच काम केले. आपल्या पराभवाची चर्चा होते ही आपली शक्ती आहे. पराभव हा अपघात आहे, विजय हा अपघात नसतो.लोक म्हणतात हे सरकार पडेल, पडू देत तुम्ही काम करा. आपल्या माणसाला पद, जागा मिळाली नाही की, नाराज होतो माणूस, हे प्रेम असते. मात्र, शेवटी पक्षाचे संस्कार लक्षात घ्या, आज येताना विमानात जागा नव्हती. डॉ. कराड यांनी एकाचे तिकीट कापले आणि मला विमानाचे तिकीट मिळाले. हे असे कापाकापी चालत राहते, मागे वळून पहा मी सुद्धा काही गोष्टी पचवल्या आहेत, तुम्ही सुद्धा पचवून घ्या, असे पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना मेळाव्यात सांगितले.

Last Updated : Nov 12, 2020, 9:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.