ETV Bharat / state

बंजारा समाजाचा एस.टी. संवर्गात समावेश करा - अमरसिंग तिलावत - वंचित बहुजन आघाडी

बंजारा समाजाचा एस.टी. संवर्गात समावेश करावा अशी मागणी तेलंगणा राज्याचे माजी पर्यटनमंत्री तथा ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमरसिंग तिलावत यांनी केली.

अमरसिंग तिलावत
author img

By

Published : Aug 11, 2019, 9:39 PM IST

औरंगाबाद - बंजारा समाजाचा एस.टी. संवर्गात समावेश करावा, अशी मागणी तेलंगाणा राज्याचे माजी पर्यटनमंत्री तथा ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमरसिंग तिलावत यांनी केली. ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारीणीची बैठक औरंगाबादेत संपन्न झाली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत अमरसिंग तिलावत बोलत होते.

गेल्या अनेक वर्षांपासून शासनाच्या सोयी-सुविधापासून बंजारा समाज दूर आहे. त्यामुळे या समाजाचा एस.टी. संवर्गात समावेश करण्याची मागणी तिलावत यांनी केली. इंग्रज भारतात आले त्यावेळी भारतात राहणाऱ्या बंजारा समाजाची आर्थिक स्थिती चांगली होती. बंजारा समाजाने इंग्रजांना विरोध केल्यामुळेच इंग्रजांनी बंजारा समाजाला बदनाम करून बंजारा समाजाला क्रिमिलेयर गटात टाकले असल्याचे तिलावत यांनी सांगितले.

वाडे-तांड्यावर राहणारा तसेच ऊसतोड मजूर म्हणून काम करणारा बंजारा समाज शासनाच्या सोयी-सुविधापासून कोसो दूर आहे. बंजारा समाजाला क्रिमीलेयरची जाचक अट टाकल्यामुळे समाजाच्या मुलांना चांगले व दर्जेदार शिक्षण मिळत नसल्याची खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली. भारतातील ओरीसा, बिहार, छत्तीसगड, तेलंगना, आंध्रप्रदेश या राज्यात बंजारा समाजाचा समावेश आदीवासी संवर्गात केलेला असून, आंध्र प्रदेशमध्ये बंजारा समाजाला १० टक्के आरक्षण असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमरसिंग तिलावत

बंजारा सेवा संघाचा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही-
ऑल इंडिया बंजारा सेवा संघ हा बंजारा समाजाच्या विविध मागण्यासाठी लढा देणारा संघ आहे. या संघाचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचे अमरसिंग तिलावत यांनी सांगितले. तसेच स्थानिक पातळीवर बंजारा सेवा संघ समन्वय समितीने वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा दिला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीस राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष डॉ.टी.सी.राठोड, राष्ट्रीय महासचीव बी.के.नाईक, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजपालसिंह राठोड, धोंडिराम राठोड, तुकाराम राठोड, मेहताबसिंग राठोड, डॉ.कृष्णा राठोड, डॉ.गजानन जाधव, प्राचार्य पृथ्वीराज पवार,कलाताई राठोड आदींची उपस्थिती होती.

Intro:गेल्या अनेक वर्षापासून शासनाच्या सोयी-सुविधापासून दुर असलेल्या बंजारा समाजाचा एस.टी.संवर्गात समावेश करावा अशी मागणी तेलंगना राज्याचे माजी पर्यटनमंत्री तथा ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमरसिंग तिलावत यांनी केली आहे.Body: रविवारी (दि.११) ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारीणीची बैठक औरंगाबादेत संपन्न झाली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अमरसिंग तिलावत बोलत होते.
इंग्रज भारतात आले त्यावेळी भारतात राहणाNया बंजारा समाजाची आर्थिक स्थिती चांगली होती. बंजारा समाजाने इंग्रजांना विरोध केल्यामुळेच इंग्रजांनी बंजारा समाजाला बदनाम करून बंजारा समाजाला क्रिमिलेयर गटात टाकले असल्याचे तिलावत यांनी सांगितले. वाडी-तांड्यावर राहणारा तसेच ऊसतोड मजूर म्हणून काम करणारा बंजारा समाज शासनाच्या सोयी-सुविधापासून कोसो दुर आहे. बंजारा समाजाला क्रिमीलेयरची जाचक अट टाकल्यामुळे समाजाच्या मुलांना चांगले व दर्जेदार शिक्षण मिळत नसल्याची खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली. भारतातील ओरीसा, बिहार, छत्तीसगड, तेलंगना, आंध्रप्रदेश या राज्यात बंजारा समाजाचा समावेश आदीवासी संवर्गात केलेला असून आंध्रप्रदेशमध्ये बंजारा समाजाला १० टक्के आरक्षण असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीस राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष डॉ.टी.सी.राठोड, राष्ट्रीय महासचीव बी.के.नाईक, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजपालसिंह राठोड, धोंडिराम राठोड, तुकाराम राठोड, मेहताबसिंग राठोड, डॉ.कृष्णा राठोड, डॉ.गजानन जाधव, प्राचार्य पृथ्वीराज पवार,कलाताई राठोड, प्रेमाताई चव्हाण, सुजाता आडे, अ‍ॅड.राकेश चव्हाण, प्राचार्य ग.ह.राठोड, अभय चव्हाण, मिलिंद पवार, रविंद्र पवार, प्रा.विजय जाधव, प्रा.रमेश राठोड आदींची उपस्थिीती होती.
---------

बंजारा सेवा संघाचा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही
ऑल इंडिया बंजारा सेवा संघ हा बंजारा समाजाच्या विविध मागण्यासाठी लढा देणारा संघ आहे. या संघाचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष अमरसिंग तिलावत यांनी सांगितले. तसेच स्थानिक पातळीवर बंजारा सेवा संघ समन्वय समितीने वंचित बहुजन आघाडीला पाठींबा दिला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले

Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.