ETV Bharat / state

भिंगीच्या स्मशानभूमीत जादूटोण्याच्या संशयाने ग्रामस्थ भयभीत - black magic case Bhingi village news

स्मशानभूमी आणि त्यातच त्या ठिकाणी लिंबू, मिरच्या व जादूटोणा संबधीचे साहित्य आढळून आले तर मग विचारायलाच नको. हे दृश्य बघितल्यानंतर कोणाचाही पाचावर धारण बसल्याशिवाय राहणार नाही. असाच काहीसा प्रकार तालुक्यातील भिंगी येथील स्मशानभूमीत घडला. स्माशनभूमीत हे दृश्य दिसल्यानंतर अख्खे गाव तेथे जमा झाले. गावकऱ्यांनी पोलिसांनाही पाचारण केले. परंतु, खोदा पहाड निकला चुहा, अशीच काहीशी गत झाली आहे.

भिंगी स्मशानभूमी
author img

By

Published : Oct 27, 2019, 8:53 PM IST

औरंगाबाद- स्मशानभूमीचे नुसते नाव काढले तर आजही चांगल्यां- चांगल्यांना घाम फुटतो. स्मशानभूमी आणि त्यातच त्या ठिकाणी लिंबू, मिरच्या व जादूटोणा संबधींचे साहित्य आढळून आले तर मग विचारायलाच नको. हे दृश्य बघितल्यानंतर कोणाच्याही पाचावर धारण बसल्याशिवाय राहणार नाही. असाच काहीसा प्रकार तालुक्यातील भिंगी येथील स्मशानभूमीत घडला. स्माशनभूमीत हे दृश्य दिसल्यानंतर अख्खे गाव तेथे जमा झाले. गावकऱ्यांनी पोलिसांनाही पाचारण केले. परंतु, खोदा पहाड निकला चुहा, अशीच काहीशी गत या ठिकाणी पाहायला मिळाली.

त्याचे झाले असे की, तालुक्यातील भिंगी येथील स्मशानभूमीत लिंबू, मिरची व अन्य साहित्य पडलेले काही नागरिकांना दिसून आले. या ठिकाणी पूजाअर्चा केल्याचेही निदर्शनास आले. तसेच या ठिकाणी लाल रंग दिसत होता. त्यामुळे या ठिकाणी नरबळी अथवा एखाद्या जनावराचा बळी दिला गेला की, काय? असा संशय नागरिकांना आला. हे दृश्य पाहून स्मशानभूमीत जादू-टोण्याचा प्रकार झाल्याची खात्री नागरिकांना पटली.

या प्रकाराची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच तेथे नागरिकांची गर्दी होऊ लागली. गावकऱ्यांच्या चर्चेअंती पोलिसांना पाचारण करण्याचे ठरले. त्यानुसार सकाळी दहा वाजेच्या सुमारास पोलीस पाटील लुकास गायकवाड यांनी वैजापूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी माहिती कळविली. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक एकनाथ पाटील, मोईस बेग, धनंजय भावे, लक्ष्मण गवळी आदींनी तालुक्यातील भिंगी येथे धाव घेतली.

हेही वाचा- जायकवाडी धरणातून गोदावरीत 51893 क्यूसेक पाण्याचा विसर्ग

स्मशानभूमीतील जागेवर लाल रंग दिसत असल्याने जमिनीत काही तरी पुरले असल्याचा गावकऱ्यांना संशय होता. मात्र, माती उकरण्यासाठी कुणीही ग्रामस्थ तयारी दर्शवत नसल्याने पोलीस नाईक मोईस बेग यांनी या जागेवरील लिंबू व मिरची बाजूला सरकवून फावड्याने जागा खोदून काढली. मात्र, तेथे काहीही आढळून आले नाही. त्यामुळे भयभीत झालेल्या ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान ग्रामीण भागात आजही लिंबू, मिरची व विशिष्ट कपडा दिसला की, नागरिक, महिला भयभीत होतात. यावरून अंधश्रध्देचा पगडा नागरिकांमध्ये किती खोलपर्यंत रुजला आहे याची प्रचिती येते. परंतु, वैजापूर पोलिसांनी अंधश्रद्धा निर्मुलनाचे काम करून ग्रामस्थांची भिती दूर केली.

हेही वाचा- औरंगाबादमध्ये फटाका व्यापारांना मंदी आणि पावसाचा फटका...

Intro:भिंगीच्या स्मशानभूमीत जादूटोण्याच्या संशयाने ग्रामस्थ भयभीत,वैजापूर तालुक्यातील प्रकार .

औरंगाबाद- स्मशानभूमीचे नुसते नाव काढले तरी आजही चांगल्याना घाम फुटतो. स्मशानभूमी अन् त्यातच त्या ठिकाणी लिंबू, मिरच्या व जादूटोणा संबधींचे साहित्य आढळून आले तर मग विचारायलाच नको. हे दृश्य बघितल्यानंतर कोणाचाही पाचावर धारण बसल्याशिवाय राहणार नाही. असाच काहीसा प्रकार तालुक्यातील भिंगी येथील स्माशनभूमीत घडला. स्माशनभूमीत हे दृश्य दिल्यानंतर अख्खे गाव तेथे जमा झाले. गावकऱ्यांनी पोलिसांनाही पाचारण केले. परंतु खोदा पहाड निकला चुहाँ अशीच काहीशी गत झाली. Body:त्याचे झाले असे की, तालुक्यातील भिंगी येथील स्माशनभूमीत लिंबू, मिरची व अन्य साहित्य पडलेले काही नागरिकांना दिसून आले. या ठिकाणी पुजाअर्चा केल्याचेही निदर्शनास आले. तसेच या ठिकाणी लाल रंग दिसत होता. त्यामुळे या ठिकाणी नरबळी अथवा एखाद्या जनावराचा बळी दिला गेला की, काय? असा संशय नागरिकांना आला. हे दृश्य पाहून स्माशनभूमीत जादू - टोण्याचा प्रकार झाल्याची खात्री नागरिकांना पटली. या प्रकाराची माहिती गावात वा-यासारखी पसरताच तेथे नागरिकांची गर्दी होऊ लागली. गावकऱ्यांच्या चर्चेअंती पोलिसांना पाचारण करण्याचे ठरले. त्यानुसार सकाळी दहा वाजेच्या सुमारास पोलीस पाटील लुकास गायकवाड यांनी वैजापूर पोलिस ठाण्यात ही माहिती कळविली. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक एकनाथ पाटील, मोईस बेग, धनंजय भावे, लक्ष्मण गवळी आदींनी तालुक्यातील भिंगी येथे धाव घेतली. स्मशानभूमीतील जागेवर लाल रंग दिसत असल्याने जमिनीत काही तरी पुरले असल्याचा गावकऱ्यांना संशय होता. मात्र माती उकरण्यासाठी कुणीही ग्रामस्थ तयारी दर्शवत नसल्याने पोलीस नाईक मोईस बेग यांनी या जागेवरील लिंबू व मिरची बाजूला सरकवून फावड्याने जागा खोदून काढली. मात्र तेथे काहीही आढळून आले नाही. त्यामुळे भयभीत झालेल्या ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान ग्रामीण भागात आजही लिंबू, मिरची व विशिष्ट कपडा दिसला की, नागरिक, महिला भयभीत होतात.Conclusion:यावरून अंधश्रध्देचा पगडा नागरिकांमध्ये किती खोलीपर्यंत आहे. याची प्रचीती येते. परंतु वैजापूर पोलिसांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करून ग्रामस्थांची भिती दूर केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.