ETV Bharat / state

दोन वर्षांच्या चिमुकल्याचा गॅलरीतून पडून मृत्यू

author img

By

Published : Jun 13, 2021, 1:07 PM IST

हसनैन झोपेतून उठला आणि खेळत गॅलरीत गेला. गॅलरीत ग्रीलवर चढून उभा राहत असताना तो खाली कोसळला. डोक्यावर पडल्याने तो बेशुद्ध पडला. नातेवाइकांनी त्याला घाटी रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी हसनैन याची तपासणी करून त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले..

चिमुकल्याचा गॅलरीतून पडून मृत्यू
चिमुकल्याचा गॅलरीतून पडून मृत्यू

औरंगाबाद- दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीतून पडून दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास भाजी मंडईत घडली. हसनैन नदीम बागवान असे मृत बालकाचे नाव आहे. नदीम बागवान हे शनिवारी पहाटे ४ वाजता जाधववाडीत गेले होते. यावेळी त्यांची पत्नी, तीन मुली व मुलगा हसनैन हे घरातील दुसऱ्या मजल्यावर झोपलेले होते. आईजवळ झोपलेला हसनैन झोपेतून उठला आणि खेळत गॅलरीत गेला. गॅलरीत ग्रीलवर चढून उभा राहत असताना तो खाली कोसळला. डोक्यावर पडल्याने तो बेशुद्ध पडला होता. नातेवाईकांनी त्याला घाटी रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी हसनैन यास तपासणी करून त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

हेही वाचा- नाशिक: बॅटबाॅल खेळताना दुसऱ्या मजल्यावरुन पडून चिमुकल्याचा मृत्यू..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.