ETV Bharat / state

अमरावतीत जुन्या वादातून युवकाची हत्या; आरोपी फरार - अमरावती बातमी

भूषण भांबुर्डे (वय 20) रा. उत्तम नगर असे मृतकाचे नाव आहे. शनिवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास पंचशील नगर परिसरातील रहिवासी रितिक भालेकर, मंगेश तायडे, अक्षय भालेकर, व इतर दोघे अशा पाच जणांनी भूषण भांबुर्डे याच्यावर यशोदानगर चौकात हल्ला चढविला.

अमरावतीत यशोदानगर चौकात युवकाची हत्या
author img

By

Published : Sep 15, 2019, 6:51 AM IST

अमरावती- जुन्या वादातून अमरावतीच्या यशोदानगर चौकात शनिवारी रात्री पाच जणांनी एका युवकावर हल्ला चढविला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवकाला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे यशोदानगर परिसरात खळबळ उडाली आहे.

भूषण भांबुर्डे (वय 20) रा. उत्तम नगर असे मृतकाचे नाव आहे. शनिवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास पंचशील नगर परिसरातील रहिवासी रितिक भालेकर, मंगेश तायडे, अक्षय भालेकर, व इतर दोघे अशा पाच जणांनी भूषण भांबुर्डे याच्यावर यशोदानगर चौकात हल्ला चढविला. यावेळी भूषण भांबुर्डे याच्यावर चाकूने वार करण्यात आले. या घटनेमुळे यशोदानगर चौकात खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच फ्रेजरपुरा पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलीस घटनास्थळी पोहोचताच पाचही आरोपींनी पळ काढला. भूषण भांबुर्डे याला जखमी अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

दरम्यान, अक्षय भांबुर्डे त्याच्या भावासोबत रितिक भालेकरचे जुन्या वादातून भांडण झाले, असल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी रात्री अक्षय भांबुर्डे यशोदानगर चौकात आला असता रितिक भालेकर सहा पाच जणांनी त्याच्यावर हल्ला चढविला. या घटनेनंतर यशोदानगर परिसरात रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. पोलिसांनी रस्त्यावरील रक्त पाणी टाकून धुतले. या घटनेमुळे यशोदानगर चौकात खळबळ उडाली असून फ्रेजरपुरा पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून ते आरोपींचा शोध घेत आहे.

Intro:(वीडियो मेलवर पाठवला)

जुन्या वादातून अमरावतीच्या यशोदानगर चौकात शनिवारी रात्री पाच जणांनी एका युवकावर हल्ला चढविला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवकाला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.या घटनेमुळे यशोदानगर परिसरात खळबळ उडाली आहे.

Body:भूषण भांबुर्डे (वय 20) रा. उत्तम नगर असे मृतकाचे नाव आहे. शनिवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास पंचशील नगर परिसरातील रहिवासी रितिक भालेकर, मंगेश तायडे, अक्षय भालेकर, व इतर दोघे अशा पाच जणांनी भूषण भांबुर्डे याच्यावर यशोदानगर चौकात हल्ला चढविला. यावेळी भूषण भांबुर्डे याच्यावर चाकूने वार करण्यात आले. या घटनेमुळे यशोदानगर चौकात खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच फ्रेजरपुरा पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलीस घटनास्थळी पोहोचताच पाचही आरोपींनी पळ काढला. भूषण भांबुर्डे याला जखमी अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दरम्यान आज दुपारी अक्षय भांबुर्डे त्याच्या भावासोबत रितिक भालेकरचे जुन्या वादातून भांडण झाले असल्याची माहिती समोर आली आहे .आज रात्री अक्षय भांबुर्डे यशोदानगर चौकात आला असता रितिक भालेकर सहा पाच जणांनी त्याच्यावर हल्ला चढविला. या घटनेनंतर यशोदानगर परिसरात रस्त्यावर रक्ताचा सडास आणला होता पोलिसांनी रस्त्यावरील रक्त पाणी टाकून धुतले या घटनेमुळे यशोदानगर चौकात खळबळ उडाली असून फ्रेजरपुरा पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून ते आरोपींचा शोध घेत आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.