ETV Bharat / state

महिला कर्मचाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन करू नये - यशोमती ठाकूर - amravati latest news

महिला कर्मचाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचा छळ, अन्याय सहन करता कामा नये. वेळीच प्रतिकार केला पाहिजे. चुकीचा प्रकार होत असल्यास वेळीच तक्रार द्यावी, शासन महिला भगिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे यशोमती ठाकूर यांनी म्हटले. मेळघाट दौऱ्यावर असताना त्यांनी येथील महिला वनकर्मचाऱ्यांशी संवाद साधला.

women employees should not tolerate any kind of injustice said yashomati thakur
महिला कर्मचाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन करू नये - यशोमती ठाकूर
author img

By

Published : Apr 18, 2021, 8:57 PM IST

अमरावती - राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी मेळघाटातील दुर्गम भागात दौरा केला. यावेळी त्यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील महिला वन कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. महिला कर्मचाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचा छळ, अन्याय सहन करता कामा नये. वेळीच प्रतिकार केला पाहिजे. चुकीचा प्रकार होत असल्यास वेळीच तक्रार द्यावी, शासन महिला भगिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे ठाकूर यांनी यावेळी म्हटले.

प्रतिक्रिया

मेळघाटाच्या दुर्गम भागातील विविध ठिकाणी भेट -

मेळघाटातील महिला वनकर्मचाऱ्यांना काम करताना येणाऱ्या अडचणी, वरिष्ठांकडून होणारा त्रास याबाबत प्राप्त तक्रारींची दखल घेऊन पालकमंत्र्यांनी मेळघाटाच्या दुर्गम भागातील विविध ठिकाणी दोन दिवस दौरा केला. यावेळी त्यांनी महिला वनकर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यांचे मनोबल वाढविले. यावेळी त्यांनी धारणी तालुक्यातील मांगीया, हरिसाल, बोरी, लवादा, चित्री, चिखलदरा तालुक्यातील जैतादेही, मोथा, आमझरी, शहापूर या गावांबरोबरच अकोट वन्यजीव परिक्षेत्रातील धारगड येथेही भेट दिली.

वनप्रशासनाने तक्रारींचे निराकरण करावे -

महाराष्ट्रात महिला भगिनी अनेक क्षेत्रांत आघाडीने कार्यरत आहेत. अशा ठिकाणी त्यांना काम करताना सुरक्षित वातावरण निर्माण होणे गरजेचे आहे. महिला वनकर्मचाऱ्यांशी बोलताना अवमानजनक भाषेचा वापर होणे, त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याऐवजी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावणे, त्यांना आपले म्हणणे मांडण्याची संधी न देणे, कॅम्पवर स्वतंत्र स्वच्छतागृह नसणे, मानसिक छळ, विशेष व्याघ्र संरक्षक दलातील वनकर्मचाऱ्यांचे पगार वेळेत न होणे, अशा गंभीर तक्रारी या भगिनींकडून आल्या आहेत. वनप्रशासनाने त्यांची तत्काळ दखल घेऊन तक्रारींचे निराकरण करावे, असे निर्देश त्यांनी वनप्रशासनाला दिले.

विशाखा समितीचे कार्य योग्यरीत्या चालवा -

महिलांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी महिला तक्रार निवारण समितीचे कार्य योग्यरीत्या चालणे आवश्यक आहे. प्रत्येक तक्रारीची वेळीच दखल घ्यावी. महिला वनकर्मचाऱ्यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी संधी द्यावी व त्यासाठी त्यांना परवानगीची गरज पडू नये, असे निर्देश त्यांनी वनाधिकाऱ्यांना दिले.

हेही वाचा - मुंबईत वाहनांसाठी कलर कोड लागू; नागरिक स्वतःही स्टिकर चिटकू शकतात, मात्र खोटी माहिती असल्यास कारवाई

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.