ETV Bharat / state

डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जन्मभूमीत कृषी महाविद्यालयासाठी पाठपुरावा करणार - यशोमती ठाकूर - कृषी महाविद्यालय अमरावती

श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात ४३० केडब्ल्यूपी क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना कृषी महाविद्यालयाचा प्रस्ताव मार्गी लागण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

सौर ऊर्जा प्रकल्प उद्घाटन कार्यक्रम अमरावती

author img

By

Published : Jan 28, 2020, 10:00 AM IST

Updated : Jan 28, 2020, 10:36 AM IST

अमरावती - भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव असणाऱ्या पापळ येथे कृषी महाविद्यालयाचा प्रस्ताव मार्गी लागण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल. असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तसेच अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सोमवारी केले.

सौर ऊर्जा प्रकल्प उद्घाटन कार्यक्रम अमरावती

श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात ४३० केडब्ल्यूपी क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शालेय शिक्षण जलसंपदा कामगार राज्यमंत्री बच्चू कडू, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, उपाध्यक्ष नरेशचंद्र ठाकरे, सचिव शेषराव खाडे, दिलीप इंगोले, हेमंत काळमेघ प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी यशोमती ठाकूर म्हणाल्या संस्थेच्या मागण्यांबाबत शासन स्तरावर वेळोवेळी पाठपुरावा करून त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. अंगणवाडी सेविका प्रशिक्षण केंद्राच्या रखडलेला अनुदानाचा प्रश्नही सोडविण्यात येईल. डॉ. पंजाबराव देशमुख यांनी शिक्षण व कृषी क्षेत्रासाठी मोलाचे कार्य केले, त्यांचा आदर्श मानून काम करणार असल्याचेही यशोमती ठाकूर म्हणाल्या.

हेही वाचा - बुलडाण्यातील तरुणीच्या हत्येची चौकशी करून आरोपींना अटक करण्याची मागणी

सौर ऊर्जा प्रकल्पासाठी 'प्रुव्हन कन्सल्टन्सी सर्व्हिसेस' या कंपनीशी करार करण्यात आला आहे त्यातून पुढील २० वर्ष महाविद्यालयाला ४ रुपये ९ पैसे दराने वीज पुरवली जाईल. म्हणजे सुमारे साडेसहा रुपये प्रतियुनिट बचत होईल त्यामुळे संस्थेला सुमारे ५० लाख रुपयांची बचत वर्षाकाठी होणार आहे. यानुसार ३० वर्षापर्यंत कंपनी देखभाल करेल त्यानंतर प्रकल्प संस्थेला हस्तांतरित केला जाणार आहे.

हेही वाचा - केंद्र सरकार व्यवसायाला संधी देत नाही - रोहित पवार

Intro:भाऊसाहेब डॉ.पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव असणाऱ्या पापळ येथे कृषी महाविद्यालयाचा प्रस्ताव मार्गी लागण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज केले.

Body:श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या डॉ. पंजाबराव देशमुख स्मृति वैद्यकीय महाविद्यालयात 430 केडब्ल्यूपी क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी शालेय शिक्षण जलसंपदा कामगार राज्यमंत्री बच्चू कडू श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, उपाध्यक्ष नरेशचंद्र ठाकरे, सचिव शेषराव खाडे,दिलीप इंगोले, हेमंत काळमेघ प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी यशोमती ठाकूर म्हणाल्या संस्थेच्या मागण्यांबाबत शासन स्तरावर वेळोवेळी पाठपुरावा करून त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल अंगणवाडी सेविका प्रशिक्षण केंद्राच्या रखडलेला अनुदानाचा प्रश्नही सोडविण्यात येईल डॉ. पंजाबराव देशमुख यांनी शिक्षण व कृषी क्षेत्रासाठी मोलाचे कार्य केले त्यांचा आदर्श मानून काम करणार असल्याचेही यशोमती ठाकूर म्हणाल्या.
सौर ऊर्जा प्रकल्पासाठी पुवँ कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीशी करार करण्यात आला आहे त्यातून पुढील वीस वर्ष महाविद्यालयाला चार रुपये 9 पैसे दराने वीज पुरवली जाईल म्हणजे सुमारे साडेसहा रुपये प्रतियुनिट बचत होईल त्यामुळे संस्थेला सुमारे 50 लाख रुपयांची बचत वर्षाकाठी होणार आहे तीस वर्षापर्यंत कंपनी देखभाल करेल त्यानंतर प्रकल्प संस्थेला हस्तांतरित केला जाणार आहे.

Conclusion:
Last Updated : Jan 28, 2020, 10:36 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.