अमरावती : अपंगांच्या विविध समस्या गत दोन वर्षांपासून सोडविण्यासाठी प्रशासनाच्या वतीने कुठलीही दखल घेतली जात नसल्यामुळे सात अपंगांनी चक्क जिल्हा परिषदेसमोर आत्मदहन इशारा दिल्यामुळे आज दिवसभर अमरावती जिल्हा परिषद कार्यालयासमोर पोलिसांचा पहारा लागला. पोलिसांच्या ताफ्यासह अग्निशमन दलाचे पथक जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर तैनात होते.
अपंगांनी दिला होता असा इशारा : अपंग बांधवांच्या वतीने धनश्री पाठवकार यांच्या नेतृत्वात शेख रुस्तम शेख बानू, प्रमोद शेव कांचन कुकडे, पूजा चव्हाण, शाहिस्ता परवीन शेख, निसार शेख भूषण सात जणांनी जिल्हा परिषदेसमोर आत्मदान करण्याचा इशारा दिला होता. जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील परसापुर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया, अमरावती शहरातील कॅनरा बँक, चांदुर रेल्वे तालुक्यातील राजुरा येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया या तिन्ही बँकेचे व्यवस्थापक अपंगांना नियमानुसार कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्यास संदर्भात गत दोन वर्षांपासून तक्रार देण्यात आली होती.
अपंगांच्या नावाखाली कर्ज : जे अपंग नाही त्यांना अपंगांच्या नावाखाली कर्ज देण्याचा प्रकार या बँकेच्या व्यवस्थापकांनी केला होता. या तिघांवरही कारवाई करण्याची मागणी अपंग संघटनेच्या वतीने करण्यात आली होती. यासह जिल्हा परिषदेमध्ये 2020 पासून आतापर्यंत बोगस अपंग प्रमाणपत्राच्या आधारे बदली केलेल्या शिक्षकांवर कारवाई करण्यात यावी. बोगस अपंग प्रमाणपत्र धारक ग्रामसेविका सुवर्णा गोवार यांना सेवेतून बरखास्त करण्यात यावे, अशा मागण्या अपंग संघटनेच्या वतीने करण्यात आल्या होत्या. या मागण्या दोन वर्षांपासून प्रलंबित असल्यामुळे आज जिल्हा परिषदेसमोर आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला होता.
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त : मंगळवारी सकाळपासूनच जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता. ओळखपत्र असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना आज पोलिसांनी जिल्हा परिषदेच्या आवारात प्रवेश दिला. दरम्यान आंदोलन करणारे अपंग बांधव एकेक करून जिल्हा परिषदेच्या परिसरात पोहोचताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. बाहेर गावावरून आलेल्या अनेक अपंग बांधवांना मध्यवर्ती बस स्थानक येथून पोलिसांनी अटक केली. पेट्रोल घेऊन आलेल्या अपंग बांधवांजवळील बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
अपंगांच्या शिष्टमंडळाने घेतली भेट : पोलिसांनी परवानगी दिल्यावर अपंगांच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पांडा यांची भेट होती. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या भेटी दरम्यान अपंग बांधवांनी आपल्या तक्रारी त्यांच्या समोर मांडल्या. अपंगांच्या समस्या येत्या काही दिवसात सोडविण्यात येईल. तसेच त्यांनी दिलेल्या तक्रारीची त्वरित चौकशी केली जाईल, असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष्यात पांडा यांनी दिल्यावर अपंग बांधवांचा रोष मावळला.
हेही वाचा - Salesforce Layoff : 2 तासात 7000 कर्मचार्यांना काढून टाकणे ही चांगली कल्पना नव्हती: सेल्सफोर्सचे सीईओ