ETV Bharat / state

धारणीत पत्रकाराला चाकूने भोकसले; हल्लेखोर सीसीटीव्हीमध्ये कैद

धारणी येथील जयस्तंभ चौक परिसरात गुरुवारी दुपारी तीन हल्लेखोरांनी एका पत्रकाराला मारहाण करून चाकूने भोकसले. या हल्ल्यात पत्रकार गंभीर जखमी झाला असून यामुळे धारणी शहरात खळबळ उडाली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

attacked on reporter
मलिक शेख
author img

By

Published : Dec 12, 2019, 8:42 PM IST

अमरावती - धारणी येथील जयस्तंभ चौक परिसरात गुरुवारी दुपारी तीन हल्लेखोरांनी एका पत्रकाराला मारहाण करून चाकूने भोकसले. या हल्ल्यात पत्रकार गंभीर जखमी झाला असून यामुळे धारणी शहरात खळबळ उडाली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

हेही वाचा - कुष्ठरोग बरा होत नसल्याने मुलांच्या आणि प्रियकराच्या मदतीने पतीचा खून

मलिक शेख (वय 25) असे हल्ल्यात जखमी झालेल्या पत्रकाराचे नाव असून ते एका सांध्य दैनिकाचे प्रतिनिधी आहेत. गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास मलिक शेख हे दाढी करण्यासाठी जयस्तंभ चौक परिसरात गेले होते. दरम्यान, तोंडाला रूमाल बांधून आलेल्या तीन युवकांनी सलूनच्या दुकानात शिरून दाढी करण्यासाठी खुर्चीवर बसलेल्या मलिक शेख यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी हल्लेखोरांनी शेख यांच्या मांडीवर आणि छातीत तसेच हातावर चाकूने वार केला व तेथून धूम ठोकली. या घटनेमुळे जयस्तंभ चौक परिसरात खळबळ उडाली. परिसरातील नागरिकांनी जखमी अवस्थेत जमिनीवर पडलेल्या मलिक शेख यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, शेख यांच्या नातेवाईकांसह शहरातील नागरिकांची गर्दी उपजिल्हा रुग्णालयात उसळली. मलिक शेख यांच्यावर उपचार सुरू असून धारणीचे पोलीस निरीक्षक एल. के. मोनडुळे यांनी आरोपींना पकडण्यासाठी पथक रवाना केले आहे.

हेही वाचा - दिव्यांग महिला बलात्कार व हत्या प्रकरण : आरोपीस 15 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

Intro:( विडिओ आणि फोटो मेलवर पाठवले.)

धारणी धारणी येथील जयस्तंभ चौक परिसरात गुरुवारी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास तीन हल्लेखोरांनी एका पत्रकाराला मारहाण करून चाकूने भोसकले. या हल्ल्यात पत्रकार गंभीर जखमी झाला असून या घटनेमुळे धारणी शहरात खळबळ उडाली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

Body:मलिक शेख (25 ) असे हल्ल्यात जखमी झालेल्या पत्रकाराचे नाव असून ते एका सांध्य दैनिकाचे प्रतिनिधी आहे. गुरुवारी दुपारी 3.30 वाजेच्या दरम्यान मलिक शेख हे दाढी करण्यासाठी जयस्तंभ चौक परिसरात गेले होते. दरम्यान तोंडाला रुमाल बांधून आलेल्या तीन युवकांनी दाढी कटिंग च्या दुकानात शिरून दाढी करण्यासाठी खुर्चीवर बसलेल्या मलिक शेख यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी हल्लेखोरांनी मलिक शेख यांच्या मांडीवर आणि छातीत तसेच हातावर चाकू मारून पळ काढला. या घटनेमुळे जयस्तंभ चौक परिसरात खळबळ उडाली. परिसरातील नागरिकांनी जखमी अवस्थेत जमिनीवर पडलेल्या मलिक शेख यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून शेख मलिकच्या नातेवाईकांसह शहरातील नागरिकांची गर्दी उपजिल्हा रुग्णालयात उसळली. मलिक शेख यांच्यावर उपचार सुरु असून धारणी चे पोलीस निरीक्षक एल.के. मोनडुळे यांनी आरोपींना पकडण्यासाठी पथक रवाना केले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.