अमरावती- जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील उंबरखेड येथे दोन दिवसांपासून महिला बेपत्ता झाली होती. त्या महिलेचा मृतदेह आज दुपारी त्यांच्या मालकीच्या शेतातील विहिरीत आढळून आला. यामुळे गावात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा-Save Aarey चळवळीला मोठे यश : MMRCने आरेतून गाशा गुंडाळला; साइटवरून साहित्य हलवले
कल्पना मनोहरराव कळबे (वय 55) असे मृत महिलेचे नाव आहे. २ दिवसांपूर्वी घरच्या शेतात निदंण करण्यासाठी गेलेल्या कल्पना कळबे घरी आल्या नव्हत्या. त्या घरी न आल्याने घरच्या लोकांनी शोध घेण्यास सुरुवात केली होती. मात्र, त्या आढळल्या नाहीत. आज दुपारच्या वेळेला काही महिला शेतातील विहिरीजवळ गेल्या असता त्यांना पाण्यावर मृतदेह तरंगत असलेल्या अवस्थेत दिसून आला.
या घटनेची माहिती गावात पसरताच ग्रामस्थांनी विहिरीवर गर्दी केली होती. या घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पंचनामा करण्यात आला आणि मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी तिवसा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.