ETV Bharat / state

Road Accident In Amravati : नादुरुस्त ट्रकवर धडकली दुचाकी; दोघेही जागीच ठार

एका नादुरस्त ट्रकवर दुचाकी (Road Accident In Amravati) धडकली. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू (Two people died) झाली. ही घटना शुक्रवारी उशिरा रात्री घडली. अमरावती -परतवाडा मार्गावरील वलगावच्या पुढे वायगाव नजिक हा अपघात (bike truck Road Accident In Amravati) घडला.

Road Accident In Amravati
अमरावतीत रस्ता अपघात
author img

By

Published : Jan 7, 2023, 2:14 PM IST

Updated : Jan 7, 2023, 3:22 PM IST

अमरावती : एका नादुरस्त ट्रकवर दुचाकी धडकून झालेल्या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना काल उशिरा रात्री अमरावती -परतवाडा मार्गावरील वलगावच्या पुढे वायगावनजिक घडली. परतवाडा मार्गावर आसेगाव पूर्णा येथून दहा किलोमीटर असलेल्या येवता या गावातील रहिवाशी राज उर्फ छोटू बाळकृष्ण अवघड आणि योगेश ओंकारराव धर्माळे हे दोघेजण काही कामानिमित्त अमरावती येथे (Road Accident In Amravati) आले होते.

अंधाराच्या काळोखात झाला अपघात - आपली कामे आटोपून ते त्यांच्या येवता गावी जाण्यासाठी सायंकाळच्या सुमारास अमरावतीवरून निघाले होते. वलगाववरून पुढे निघाल्यानंतर वायगाव फाट्यावर उभ्या असलेल्या पंक्चर ट्रकला त्यांची दुचाकी धडकली. यामध्ये दोघेही (Two people died) जबर गंभीररीत्या जखमी झाले. धडक एवढी भीषण होती की, त्या धडकेमध्ये दोघेजण जागीच ठार (bike truck Road Accident In Amravati) झाले.

हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार : त्यांना रुग्णवाहिकेने जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. शुक्रवारी दुपारी ३ वाजता येवता येथील हिंदू स्मशानभूमीत दोघांवरही अंत्यसंस्कार करण्यात आले. ही दुचाकी योगेशची असून राजू चालवत होता, अशी माहिती पुढे आली (wo people died in bike truck Road Accident) आहे.

यापूर्वीची घटना : तिवसा ते कुऱ्हा मार्गावर नोव्हेंबरमध्ये वाठोडा गावानजीक भरधाव ट्रकने ऑटो रिक्षा व दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडली होती. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. १४ जण गंभीर असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली होती. (accident in amravati)

ट्रकने दिली रीक्षा आणि दुचाकीला जोरदार धडक : प्राप्त माहितीनुसार, तिवस्यावरून वाठोडा मार्गे कुऱ्हा जाणाऱ्या भरधाव ट्रकने कुऱ्हावरून प्रवासी घेऊन येणाऱ्या रीक्षा आणि दुचाकीला जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात घडला होता. या अपघातात घटनास्थळी दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला होता. तर अन्य एकाचा अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती मिळाली होती. तर यामध्ये एकूण 14 जण जखमी असून 7 जण गंभीरित्या जखमी झाले होते.

अपघातातील जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले : अपघातातील जखमींना तिवसा उपजिल्हा रुग्णालयात, नंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले असून जखमींमध्ये उमेश शिंदे राहणार मोझरी, शितल माटे राहणार जळका, रेखा वाघमारे, शे.बाजार, सीमा तेलंग, रोनक विशाल तेलंग, हिंगणघाट, श्रीकृष्ण वाघमारे, शे.बाजार, आरोही तेलंग, श्वेता शेंद्रे, विराट शेंद्रे, दीप्ती शेंद्रे, प्रांजली हेमंत गोरखेडे, ऋतुश्री गौरखेडे, सानवी गौरखेडे सर्व राहणार तिवसा अशी जखमींची नावे होते. तर सोमा तापा कोरटकर (वय 45) राहणार घोटा व कैलास वाघमारे वय 50 राहणार शे.बाजार यांचा मृत्यु झला होता.

Last Updated : Jan 7, 2023, 3:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.