ETV Bharat / state

Victims Of Illegal Liquor : अवैध गावठी दारू पिल्याने दोन ठार, मोर्शी तालुक्यात खळबळ

author img

By

Published : Jul 20, 2023, 5:17 PM IST

मोर्शी तालुक्यातील तरोडा धानोरा या आदिवासी बहुल गावात अवैध गावठी दारूच्या सेवनाने दोघांचा मृत्यू झाला असून पाच जणांना मोर्शी उपजिल्हा रुग्णालय येथून जिल्हा सामान्य रुग्णालय भरती करण्यात आले. ही घटना बुधवरी रात्री घडली.या घटनेमुळे संपूर्ण मोर्शी तालुका हादरला आहे.

excitement in Morshi taluka
मोर्शी तालुक्यात खळबळ

अमरावती : मोर्शीपासून अवघ्या 5 कि.मी.अंतरावर असलेल्या तरोडा धानोरा भिवकुंडी या गट ग्रामपंचायत असलेल्या तरोडा धानोरा येथे रात्री काही पुरूष व महीला जंगलु टेकाम वय (६२) रा.तरोडा, मयाराम धुर्वे वय (६७) रा.तरोडा, सिताराम शेषराव परतेती वय (३७) रा.तरोडा, सुंदा मयाराम धुर्वे वय (65) रा. तरोडा, सौ.सिंधु धुर्वे वय (45)रा.तरोडा, सुमेलाल श्यामू कुमरे वय (40) तरोडा, सुखदेव जिवता उईके वय (42)रा.धानोरा यांची अवैध गावठी मोहाची दारू प्याल्याने प्रकृती अचानक अस्वस्थ झाली. त्यांना चक्कर व उलटी होऊ लागल्याने त्यांना मोर्शी उप-जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अस्वस्थ झालेल्यापैकी जंगलु टेकाम, मयाराम धुर्वे वय रा. तरोडा यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. इतर अस्वस्थ रूग्णांपैकी सिताराम शेषराव परतेती, सुंदा मयाराम धुर्वे, सिंधु इसम धुर्वे, सुमेलाल शामू कुमरे आणि सुखदेव जीविता उईके यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचाराकरिता अमरावती येथे दाखल करण्यात आले आहे.

सदरची दारू सौ.चन्द्रकला जंगलु टेकाम तरोडा हीने पिण्यास दिली व सुंदा मयाराम धुर्वे, मयाराम धुर्वे, सिंधु इसम धुर्वे यांनी ती दारू पिली त्यातूनच त्यांना बाधा झाली असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस तपासात मृतक मयाराम धुर्वे यानेच ती दारू आणली होती व सदर दारू पिल्याने प्रकृती बिघडत असल्याचे माहीत असुन सुध्दा चंद्रकला टेकाम हीने ती दारू त्याला पीण्यास दिली यावरून दोन्ही आरोपी विरूध्द गुन्हो नोंदवले आहेत.

चन्द्रकला टेकाम हीला मोर्शी पोलिसांनी ताब्यात घेऊन विचारपुस करण्यात येत असुन दुसरा आरोपी मयाराम धुर्वे हा उपचारा दरम्यान मरण पावला आहे. मोर्शी लगतच काही किलोमीटर अंतरापासून मध्यप्रदेश हद्द सुरू होत असून मध्य प्रदेश हद्दीत असलेल्या पहाडपट्टीचा व वाढलेल्या झाडाझुडपांचा आडोसा घेऊन अवैध हातभट्टीची गावठी दारू काढण्याचा गोरखधंदा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सिमावर्ती जिल्हयातील काही भागातून हातभट्टीची दारू मध्यप्रदेश येथुन मोर्शी ठाण्याच्या सिमेलगतच्या काही खेडयात आणली जाते.

त्याच प्रमाणे सिमेलगतच्या खेडयातून रोजगाराकरिता मजुर वर्गाची ये-जा असते अश्यावेळी मध्यप्रदेशच्या सिमे वरील एखादया खेडयातून सदर गावठी दारू पिण्यासाठी आणली असावी.असा प्राथमीक अंदाज व्यक्त केल्या जात आहे. मध्यप्रदेश पोलीस व महाराष्ट्र पोलिस पथक दारू काढणाऱ्या परिसरात तैनात करण्यात आले असून मध्यप्रदेश येथून अवैध गावठी दारूची तस्करी करून खेड्यापाड्यात दारू पुरविणाऱ्या राजकुमार साबळे याला सुद्धा मोर्शी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच दारू काढणाऱ्या मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू आहे.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक ग्रामीण अविनाश बारगळ पोलीस उपविभागीय अधिकारी निलेश पांडे यांनी घटनास्थळी भेट दिली.घटनेचे गांभीर्य लक्षात घेता मध्यप्रदेशातील आठनेर पोलीस,महाराष्ट्र पोलीस जिल्हास्तरावरील आरसीबी पथक दंगा नियंत्रण पथक,स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक या ठिकाणी तैनात करण्यात आले असून दारू काढणाऱ्या परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.