ETV Bharat / state

रखरखत्या उन्हात रोपांना पाणी अन् चिमणी पाखरांची तृष्णा तृप्ती - अमरावती तपोवन वृक्ष पाणी पुरवठा न्यूज

अमरावतीच्या तपोवन भागात पर्यावरणप्रेमींच्या प्रयत्नांतून वृक्षांना आणि पक्षांना पाणी मिळत आहे. दिशा संस्थेच्या सोबतच काही शासकीय विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी यासाठी प्रयत्न केले आहेत.

​​Amravati environmentalists efforts for birds and trees
अमरावती पर्यावरणप्रेमी वृक्ष आणि पक्षी पाणी पुरवठा
author img

By

Published : Mar 18, 2021, 7:18 AM IST

अमरावती - केवळ वृक्षलागवड न करता वृक्षांना जगवण्याचे आणि टिकवण्याचे महत्त्वाचे कार्य दिशा संस्थेच्यावतीने अमरावतीच्या तपोवन परिसरात सुरू आहे. गेल्या दोन वर्षांपासून हे काम सुरू आहे. दिशा संस्थेच्या सोबतच काही शासकीय विभागाचे अधिकारी-कर्मचारी व विविध क्षेत्रातील वृक्षप्रेमींनी या हरित चळवळीत सहभाग घेऊन दोन हजाराच्या वर विविध प्रजातींचे वृक्ष तपोवन परिसरात लावले आहेत. याच पर्यावरणप्रेमींच्या प्रयत्नांतून गेल्या आठ दिवसांपासून या ठिकाणी 24 तास पाणी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे रखरखत्या उन्हात सुकलेल्या वृक्षांना पाणी मिळत आहे. यासोबतच जंगलात असणाऱ्या पक्षांचीही तहान भागत आहे.

अमरावतीच्या तपोवन भागात पर्यावरण प्रेमींच्या प्रयत्नांतून वृक्षांना आणि पक्षांना पाणी मिळत आहे.
दोन हजार वृक्ष लावण्यासाठी वृक्षप्रेमी एकत्र -दिशा संस्थेसह वस्तू व सेवा कायदा विभागातील वृक्षप्रेमी कर्मचारी, जिल्हाधिकारी कार्यालयातील काही मंडळी आणि तपोवन संस्थेतील काही सदस्य हे अडीच वर्षांपूर्वी एकत्र आले. कुष्ठरोगी बांधवांची कर्मभूमी असणाऱ्या तपोवन परिसराला लागून जंगल आहे. या भागात वृक्षारोपण करणे आणि वृक्ष संवर्धन करणे हा उद्देश बाळगून सर्वांनी दोन वर्षांपासून या भागात विविध प्रजातींचे एकूण दोन हजार वृक्ष लावले. दररोज सकाळी 7 ते 9 तसेच शनिवारी आणि रविवारी सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत वृक्षप्रेमींनी एकत्रीत मेहनत घेऊन या भागात वृक्ष लागवड केली.पाण्याचे कॅन आणून द्यावे लागले पाणी -

आपण लावलेली झाडे टिकावीत यासाठी वृक्षप्रेमींनी मागील उन्हाळ्यात आपल्या दुचाकींवर पाण्याच्या कॅन बांधून या परिसरात आणल्या आणि वृक्षांना पाणी देण्याचा प्रयत्न केला. यावर्षी मात्र, त्यांचे हे कष्ट वाचले आहेत.

विज्ञानाची करणी आणि वृक्षांना पाणी -

तपोवन परिसरलगत राजुरा टेकडीवर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे जल शुद्धीकरण केंद्र आहे. अप्पर वर्धा धरणातील पाणी या केंद्रांवर येते. पाणी टेकडीवर चढावे यासाठी हवेचा दाब कमी व्हावा म्हणून प्रेशर कमी केले जाते. या वैज्ञानिक प्रक्रियेदरम्यान पाईपमधून वाहणारे पाणी एका ठिकाणावरून सतत बाहेर पडत असते. बाहेर पडणारे पाणी 24 तास इकडे तिकडे वाहून जाते. दिशा संस्थेचे प्रमुख व महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळ सदस्य यादव टरटे यांना वाहून जात असलेल्या पाण्याची माहिती मिळाली. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत आता आठ दिवसांपूर्वी पाणी वाया जात असलेल्या ठिकाणापासून वृक्षलागवड केलेल्या 2 किमी अंतरापर्यंत चर खोदून वाया जाणारे पाणी आणले. चार ठिकाणी मोठे खड्डे खोदले. या खड्ड्यात आता हे पाणी साचते. या खड्ड्यातून बादलीने पाणी काढून वृक्षांना देणे सोपे झाले आहे. यादव टरटे आणि त्यांचे सहकारी दररोज सकाळी व सायंकाळी या भागात येऊन वृक्षांना पाणी देत असल्याने वृक्षांवर आता हिरवी पालवी आली आहे. वृक्षप्रेमींनी लावलेली चिंच, बेहडा, पिंपरणा, आवळा, रिठा, तटू, पिंपळ, वड, अमलतास, पापडा, कवठ, उंबर, मुकचुंद, जांभूळ या वृक्षांच्या रोपांवर पालवी बहरायला लागली आहे.

पक्षांनाही मिळाले पाणी -

जीवन प्राधिकरणाच्या वाया जाणाऱ्या पाण्याला दिशा विविध पक्षांनाही आपली तहान भागवणे शक्य झाले आहे. कावळा, चिमणी, साळुंखी यासारख्ये अनेक पक्षी या ठिकाणी पाणी पिण्यासाठी येतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.