ETV Bharat / state

ओमायक्रॉन संकटाच्याही सावटातही चिखलदरा, मेळघाटात 'थर्टी फर्स्ट'साठी पर्यटकांचे बुकिंग हाऊसफुल्ल.. - ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर चिखलदऱ्यात बुकींग फुल्ल

राज्यात कोरोनाचा नवीन व्हेरिएंट (Omicron variant in maharashtra ) ओमायक्रॉन विषाणूचा धोका कायम असला तर अद्याप त्याचा परिणाम पर्यटनावर झाला नाही. दरवर्षीप्रमाणे यंदाही ख्रिसमस आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक (Thirty First party booking full in Chikhaldara) मेळघाट व चिखलदरामध्ये बुकींग सुरु केले आहे. चिखलदरामध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची असलेल्या दोन्ही रिसॉर्टमध्ये (Chikhaldara Hill Station Resort ) प्रत्येकी 50 टक्के बुकींग झाले आहे. येत्या 10 ते 15 दिवसांत हे बुकींग हाऊसफुल्ल होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Thirty First party booking  full in Chikhaldara

author img

By

Published : Dec 15, 2021, 4:30 PM IST

अमरावती - राज्यात कोरोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचा (Omicron variant in maharashtra )धोका असला तरी त्याचा फार परिणाम पर्यटनावर झालेला नाही. कारण यंदाही ख्रिसमस नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक मेळघाट व चिखलदरामध्ये दाखल होण्याचा अंदाज आहे. चिखलदरामध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे असलेले दोनही रिसॉर्ट राहण्यासाठी पर्यटकांनी (Thirty First party booking full in Chikhaldara) बुकिंग केले आहेत. सध्या 50 टक्के बुकिंग दोन्ही रिसॉर्टचे झाले आहेत. पुढील १० दिवसांत उर्वरित बुकिंग हाऊसफुल्ल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेहमी प्रमाणेच यंदाही हजारोच्या संख्येने पर्यटक नववर्षाच्या स्वागतासाठी चिखलदरामध्ये दाखल होणार आहे.

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक दरवर्षी राज्यातील विविध पर्यटनस्थळला भेटी देत असतात. अमरावतीच्या चिखलदऱ्यात ही ख्रिसमस नाताळ ते पाच जानेवारीपर्यंत पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. मात्र यंदा ओमायक्रॉनचा धोका असल्याने पर्यटकांची गर्दी कमी राहील, असे अनेकांना वाटत होते. परंतु दरवर्षीप्रमाणे यंदाही पर्यटक चिखलदऱ्यात दाखल होण्याचा अंदाज आहे. चिखलदरामध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या दोन रिसॉर्ट (Chikhaldara Hill Station Resort ) बरोबर अनेक शासकीय व खाजगी विश्रामगृह देखील आहेत. हे विश्रामगृहे आता 25 ते 30 तारखे दरम्यान बुकींग होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आगामी काळात चिखलदऱ्यातील विश्रामगृह रिसॉर्ट 100% बुकिंग होणार असल्याचे सांगितले जात आहे.

चिखलदरा, मेळघाटात 'थर्टी फर्स्ट'साठी पर्यटकांचे बुकिंग हाऊसफुल्ल..
काय आहे चिखलदरा पर्यटनस्थळाचे महत्व -

चिखलदरा हे पर्यटनस्थळ राज्यातील महत्वाचे पर्यटन स्थळ आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पही या पर्यटन क्षेत्रात येतो. विदर्भातील सर्वाधिक थंड हवेचे ठिकाण म्हणून चिखलदराची ओळख आहे. विविधतेने नटलेला हा संपूर्ण मेळघाटचा भाग आहे. दरवर्षी चिखलदऱ्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस होतो. चिखलदरामध्ये असलेल्या डोंगरदर्‍यात या पर्यटकांसाठी कायम आकर्षणाचा विषय राहिला आहे. नागमोडी रस्ते हजारो फूटवरून कोसळणारे पाण्याचे धबधबे सकाळचे धुके हे पाहण्यासाठी पर्यटक दरवर्षी गर्दी करतात. चिखलदरामध्ये गाविलगड किल्ला आहे, जो इतिहासाची साक्ष देतो. तसेच तेथील आदिवासी संस्कृती आदिवासी बांधवांच्या परंपरा यादेखील पर्यटकांसाठी हा आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे दरवर्षी पर्यटक येथे गर्दी करत असतात.

हे ही वाचा - महाबळेश्‍वर येथील नाताळावर कोरोन‍ाचे सावट, पर्यटकांनी केले बुकींग रद्द

व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीला ही प्राधान्य -

चिखलदाराला लागून मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे. या व्याघ्र प्रकल्पात अनेक प्रजातीचे हजारो जंगली प्राणी आहेत. मेळघाटच्या या घनदाट जंगलात वाघ, हरण, चित्ता , गवा अशा अनेक विविध प्रजातीचे प्राणी वास्तव्यास आहेत. या प्राण्यांना पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत असतात. जंगल सफारीच्या माध्यमातून पर्यटक हे प्राणी पाहत असतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.