अमरावती - विधानसभा निवडणुकीचे मैदान आता चांगलेच तापले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. आज अमरावती जिल्ह्यातील दुर्गम भाग असलेल्या मेळघाटमधील धारणीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दुपारी ३ वाजता जाहीर सभा होणार आहे.
हेही वाचा - शरद पवार तुम्हाला स्वस्थ बसू देणारच नाही - उध्दव ठाकरे
हेही वाचा - 'इतकी वर्ष सडली आणि १२४ वर अडली', राज यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
मेळघाट विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार रमेश मावस्कर यांच्या निवडणूक प्रचारार्थ अमित शाह हे आज सभा घेत आहेत. अमित शाह हे प्रथमच अमरावती जिल्ह्यात येत आहेत. शाहा हे नेमके मेळघाट मतदार संघातच का सभा घेत आहेत हाही प्रश्न अनुत्तरित आहे. या मतदारसंघात गतवेळी भाजपचे प्रभूदास भिलावेकर विजयी झाले होते. मात्र, यंदा भाजपने भिलावेकर यांची तिकीट कापून रमेश मावस्कर यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, राजकारणात नवखे असलेल्या मावस्कर विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी आमदार केवलराम काळे तर प्रहार कडून माजी आमदार राजकुमार पटेल हे निवडणूक रिंगणात आहे. या मतदारसंघात तिहेरी लढत होत आहे. आजच्या प्रचारसभेत अमित शाह हे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.