ETV Bharat / state

अमरावतीत मुलीवर वाघाचा हल्ला; धारणीतील केकदाखेड्याची घटना - swapnil umap

मंगळवारी सायंकाळी अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्याच्या केकदाखेडा या गावात एका बारा वर्षीय चिमुकलीवर हल्ला चढविला. हल्ल्यातून चिमुकली बचावली असून उपचार सुरू आहे.

वाघाच्या हल्ल्यात जखमी चिमुकली
author img

By

Published : Jul 3, 2019, 8:21 AM IST

अमरावती - जिल्ह्यातील धारणी तालुक्यापासून २८ किमी अंतरावर केकदाखेडा गाव आहे. या गावात १०-१२ घरे असून मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घराबाहेर खेळत असलेल्या बारा वर्षाच्या मुलीवर वाघाने हल्ला चढविल्याची घटना घडली. बारकी राजु डवाल (वय १२ वर्षे), असे या मुलीचे नाव आहे.

अचाणकपणे वाघाने प्राणघातक हल्ला चढविल्याची ही बातमी पसरताच संपूर्ण धारणी तालुक्यात एकच खळबळ माजली असून दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. केकदाखेडा गावाभोवती घनदाट जंगल आहे. जवळच पूनर्वसित डोलार जंगल आहे. २३ जूनला डोलार जंगलात नागपूर येथील वाघ वनविभागाने सोडला असून तोच वाघ आता गावात दहशत निर्माण करत आहे, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती.

बारकिला धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करुन उपचार सुरु करण्यात आले आहे. संबंधित वनविभाग वाघाच्या शोधात असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले आहे. सोबतच गावांमध्ये दहशतीचे वातावरण दिसून येत आहे.

Intro:धारणीत आदिवासी मुलीवर वाघाचा हल्ला
पुनर्रवसीत केकदाखेडा येथील घटना.

अमरावती अँकर
अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यापासून
२८ ,किमी अंतरावरील १०-१२ घरे असणाऱ्या केकदाखेडा गावात मंगळवारी सायंकाळीच्या दरम्यान आपला घराबाहेर खेळत असलेल्या बारकी राजु डवाल या वय१२ वर्षीय मुलीवर अचाणकपणे वाघाने प्राणघातक हल्ला चढविला हि बीतमी पसरताच संपुर्ण धारणी तालुक्यात एकच खडबळ माजली असुन दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
केकदाखेडा गावाभोवती संपुर्ण घणदाट जंगल आहे व जवळच पुनर्रवसित डोलार चे जंगल आहे. गुप्त सुत्रानुसार मिळालेल्या माहीतीनुसार २३ जुन ला डोलार जंगलात नागपुर येथील आदमखोर वाघ वनविभागाने सोडला व तोच वाघ आता गावात दहशत निर्माण करत आहे. बारकि ला धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करुन उपचार सुरु करण्यात आले आहे. संबंधित वनविभाग आदमखोर वाघाच्या शोधात असल्याचे गावकऱ्यांनी सांगीतले आहे सोबतच गावांमध्ये दहशती चे वातावरण दिसुन येत आहे.Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.