ETV Bharat / state

धक्कादायक : राणा दाम्पत्यांचे स्वॅब निघाले चुकीचे - अमरावती कोरोना अपडेट्स

आमदार रवी राणा आजारी असल्यामुळे त्यांच्यावर एक खासगी रुग्णालतात उपचार सुरू आहेत. शनिवारी आमदार रवी राणा यांच्यासह खासदार नवनीत राणा यांचे थ्रोट स्वॅब घेण्यात आले होते. आज हे स्वॅबच नसल्याचे नागपूर येथील डॉक्टरांनी स्पष्ट केल्यामुळे खळबळ उडाली.

धक्कादायक : राणा दाम्पत्यांचे स्वॅब निघाले चुकीचे

author img

By

Published : Apr 19, 2020, 8:39 PM IST

अमरावती - खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचे स्वॅब चुकीचे असल्याचे नागपूरच्या एम्स रुग्णालयाने स्पष्ट केल्यामुळे खळबळ उडाली आहे. अमरावतीत डॉक्टरांना योग्य पद्धतीने स्वॅबच घेता येत नसल्याचा धक्कादायक प्रकार यानिमित्ताने समोर आला आहे.

धक्कादायक : राणा दाम्पत्यांचे स्वॅब निघाले चुकीचे

आमदार रवी राणा आजारी असल्यामुळे त्यांच्यावर एक खासगी रुग्णालतात उपचार सुरू आहेत. शनिवारी आमदार रवी राणा यांच्यासह खासदार नवनीत राणा यांचे थ्रोट स्वॅब घेण्यात आले होते. आज हे स्वॅबच नसल्याचे नागपूर येथील डॉक्टरांनी स्पष्ट केल्यामुळे खळबळ उडाली.

खासदार नवनीत राणा यांनी या प्रकाराबाबत जिल्हा शल्यचिकित्सक शामसुंदर निकाम यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. खासदार आणि आमदारांच्या स्वॅबबाबत गांभीर्य नाही. तेथे सर्वसामान्य व्यक्तींच्या स्वॅबचे काय यात तर काही घोळ झाला असेल तर याचे परिणाम किती गंभीर होतील असा सवालही खासदार राणा यांनी उपस्थित केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.