अमरावती- जिल्ह्यातील तिवसा येथील एका रेस्टॉरंटमध्ये काम चालू असताना ड्रिल मशीनद्वारे लोखंडी पाईप कटाई करत असताना मांजऱ्या जातीचा निमविषारी सापाला मार लागला होता. त्याच्यावर तिवसा वनविभागाच्या कार्यालयात यशस्वी उपचार करण्यात आले.
हेही वाचा- अर्थसंकल्प २०२० : व्याजातून मिळणाऱ्या उत्पन्नावर अधिक सवलत देण्यावरून गोंधळ
महामार्गावरील एका रेस्टॉरंटमध्ये काम चालू होते. दरम्यान, लोखंडी पाईपची कटाई करत असताना मजुराला साप दिसला. मात्र, तो जखमी अवस्थेत होता. त्याला बाहेर येता येत नव्हते. सर्पमित्र सागर मिर्झापुरे यांना घटनास्थळी बोलावण्यात आले. सागरने सापाला बाहेर काढले. त्याला तिवसा वनविभागाच्या स्वाधीन करुन वनविभागाचे वनपाल येवले यांनी पशू वैधकीय डॉक्टरांना याची माहिती दिली. वेळेचे गांभीर्य लक्षात घेत डॉ. श्याम बोबडे यांनी वन विभागाच्या कार्यालयातच सापावर उपचार केले. यात सापाला दहा टाके घालून सापावर यशस्वी उपचार करण्यात आले.