ETV Bharat / state

अमरावतीत बंद दरम्यान दगडफेक; पोलिसांनी दिला चोप - व्यापारी प्रतिष्ठाण

अमरावतीत बंद समर्थकांनी इर्विन चौक परिसरातील व्यापारी प्रतिष्ठानांवर दगडफेक केली. त्यामुळे धुमाकूळ घालणाऱ्या काही समर्थकांना पोलिसांनी चोप देऊन ताब्यात घेतले.

पोलिसांनी दिला चोप
पोलिसांनी दिला चोप
author img

By

Published : Jan 24, 2020, 2:44 PM IST

अमरावती - वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंद दरम्यान अमरावती शहरात तणाव निर्माण झाला. बंद समर्थकांनी इर्विन चौक परिसरातील व्यापारी प्रतिष्ठानांवर दगडफेक केली. त्यामुळे धुमाकूळ घालणाऱ्या काही समर्थकांना पोलिसांनी चोप देऊन ताब्यात घेतले.

अमरावतीत बंद समर्थकांची दगडफेक

शहरात इर्विन चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते एकत्रित आले. कार्यकर्त्यांनी नवीन चौकात ठिय्या देऊन रास्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. इर्विन चौक येथून बंद समर्थक जयस्तंभ चौकाच्या दिशेने निघाले. पोलिसांनी मोर्चा काढण्यास नकार दिला होता. मात्र दरम्यान, रस्त्यावरील उघड्या असणाऱ्या व्यापारी प्रतिष्ठानांवर समर्थकांनी अचानक दगडफेक केली. त्यामुळे त्याठिकाणी गोंधळ उडाला. पोलिसांनी काही आंदोलकांना चोप देऊन ताब्यात घेतले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे डाॅ. आलिम पटेल, अ‌ॅड. सिद्धार्थ गायकवाड यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि दगडफेक करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकारामुळे इर्विन चौक परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Intro:(वीडियो लगेच पाठवतो)

वंचित बहुजन आघाडी ने पुकारलेल्या महाराष्ट्र बंद दरम्यान आज अमरावती शहरात बंद समर्थकांनी इर्विन चौक परिसरात व्यापारी प्रतिष्ठाणावर दगडफेक केल्याने तणाव निर्माण झाला. या घटनेनंतर धुमाकूळ घालणाऱ्या बंद समर्थ कांदा पोलिसांनी चौक घेऊन ताब्यात घेतले.

Body:देशाची डबघाईस आलेली अर्थव्यवस्था तसेच नागरिकत्व संशोधन कायद्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. अमरावती शहरात इर्विन चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते एकत्रित आले. यानंतर बंद समर्थकांनी नवीन चौकात ठिय्या देऊन रस्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. इर्विन चौक येथून बंद समर्थक जायस्तंभ चौकाच्या निघाले असताना मधात उघड्या असणाऱ्या व्यापारी प्रतिष्ठानांवर बंद समर्थकांनी अचानक दगडफेक केल्यामुळे पोलिसांनी बंद समर्थकांना मोर्चा काढण्यास नकार देताच एकच गोंधळ उडाला. परिस्थितीची डोळ्यांमुळे पोलिसांनी काही बंद समर्थकांना चोप देऊन ताब्यात घेतले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर आलिम पटेल एडवोकेट सिद्धार्थ गायकवाड यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि धुमाकूळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकारामुळे इरविन चौक परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.