अमरावती - राज्यात कोरोनाचे सावट असले तरी साध्या पध्दतीने गणेश भक्त यंदाही गणेशोत्सव साजरा करत आहे. दरवर्षी अनेक जण विविध देखाव्याच्या माध्यमातून गणपतीच्या निमित्ताने सामाजिक संदेश देत असतात. यंदा कोरोनाची परिस्थिती अनेक कलाकारांनी आपल्या देखाव्यातून साकारली आहे. कोणी कोरोना योद्धाची तर कुणी मुंबई महानगर पालिकेच्या कारभारात विषयी देखावे साकारले आहे. तर अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जीमधील एका तरुणीने पंढरीचा देखावा साकारला आहे. ज्यामध्ये विठ्ठलाच्या वारकऱ्यांना पंढरीची लागलेली आस दाखवण्यात आले आहे. पथ्रोट येथील पूजा डवरे या तरूणीने आपल्या घरी हा देखावा साकारला आहे. डवरे कुटुंब गेली सहा वर्षांपासून आपल्या गणेश उत्सवाच्या देखाव्यातून विविध सामाजिक संदेश देऊन गणेश उत्सव साजरा करतात. यंदाही अशोक डवरे यांची मुलगी पूजा व सुरज या बहिण भावांनी सामाजिक परिस्थितीवर घरगुती गणेश उत्सवाच्या माध्यमातून संदेश दिला आहे.
हेही वाचा - पुण्यातील 400 वर्ष पूर्वीचे गणेश मंदिर 'खिंडीतला गणपती'; जाणून घ्या इतिहास