ETV Bharat / state

दुसऱ्याला बदनाम करण्यासाठी राणा दाम्पत्याची नौटंकी; अडसूळ यांची बोचरी टीका

दोन दिवसांपूर्वी बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा यांनी माजी खासदार व शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांची ईडी कार्यालयात तक्रार केली होती. त्यानंतर अडसूळ यांनी राणा दाम्पत्यावर बोचरी टीका केली आहे. आपण अडचणीत सापडलो म्हणून दुसऱ्याला बदनाम करण्यासाठी राणा दाम्पत्य ही नौटंकी करत आहे, असे अडसूळ यांनी म्हटले आहे.

अमरावती आनंदराव अडसूळ न्यूज
अमरावती आनंदराव अडसूळ न्यूज
author img

By

Published : Jan 7, 2021, 2:26 PM IST

अमरावती - दोन दिवसांपूर्वी बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा यांनी माजी खासदार व शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांची ईडी कार्यालयात तक्रार केली होती. त्यानंतर अडसूळ यांनी राणा दाम्पत्यावर बोचरी टीका केली आहे. आपण अडचणीत सापडलो म्हणून दुसऱ्याला बदनाम करण्यासाठी राणा दाम्पत्य ही नौटंकी करत आहे, अशी टीका माजी खासदार व शिवसेना नेते अडसूळ यांनी केली आहे.

दुसऱ्याला बदनाम करण्यासाठी राणा दाम्पत्याची नौटंकी
हेही वाचा - शिवसेना नेते अडसूळ व त्यांच्या पीएविरोधात आमदार राणांची ईडीकडे तक्रार

कर्जवाटपाबद्दल मी तक्रारी केल्या आहेत

माजी खासदार अडसूळ म्हणाले की, 'मी सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचा चेअरमन आहे. हे नाकारता नाही परंतु ज्या प्रकारे माझ्या अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने कर्ज वाटप केले त्याची तक्रार मी यापूर्वीच केली आहे आणि सध्या त्यांची चौकशीदेखील सुरू आहे.' दरम्यान, या प्रकरणाशी ईडीचा संबंध नाही, असे अडसूळ म्हणाले.

राणा दाम्पत्याला पद जाण्याची भीती

राज्य सरकारची परवानगी घेतल्यानंतरच सीबीआयला महाराष्ट्रत कोणाची चौकशी करता येणार आहे. परंतु, आता एईडीच्या माध्यमातून बदनाम करण्याचे कारस्थान सुरू असल्याचे अडसूळ म्हणाले. आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना आपले पद जाण्याची भीती आहे. त्यामुळे त्यांनी माझी तक्रार केली असावी, असे मला वाटते. दरम्यान, मला चौकशीला ईडी बोलावेल असे वाटत नाही. जर ईडीने चौकशीला बोलावले तर मी न घाबरता चौकशीला जाईन, असेही अडसूळ म्हणाले.

हेही वाचा - नक्षलवाद्यांच्या गडावर आदिवासींच्या परंपरागत ठाकुरदेव यात्रेला सुरुवात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.