ETV Bharat / state

Sharad Pawar Threat Case : शरद पवार धमकी प्रकरणी आठवडभरानंतर सौरभ पिंपळकर माध्यमांसमोर - Saurabh Pimpalkar reaction on Sharad Pawar

शरद पवार यांच्या धमकी प्रकरणात माझा काहीही संबंध नाही. शरद पवार यांचा दाभोलकर होईल या पोस्टसोबत माझा संबंध नाही, मी ट्विट केले नाही, शेअर केले नाही. लाईक सुद्धा केले नाही, असा दावा सौरभ पिंपळकर याने केला आहे. शरद पवार धमकी प्रकरणातील नाव समोर आलेल्या सौरभ पिंपळकर याने आठवडाभरातनंतर प्रसिद्धी माध्यमापुढे येत हे विधान केले.

Sharad Pawar Threat Case
Sharad Pawar Threat Case
author img

By

Published : Jun 17, 2023, 7:16 PM IST

सौरभ पिंपळकर यांची प्रतिक्रिया

अमरावती : शरद पवार यांचा दाभोलकर करु अशी धमकी सोशल मिडियावर देण्यात आली होती. या प्रकरणी सौरभ पिंपळकर हा संशयित आरोपी असल्याचा आरोप करण्यात आला होता. प्रसिद्धी माध्यमांमध्ये हे प्रकरण आल्यानंतर भाजपाने पिंपळकर याची पाठराखण केली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावती दौऱ्यावर आले असता त्यांनी पिंपळकर याच्याशी संपर्क साधून आपण तुझ्या पाठीशी असल्याचे सांगितले होते.

मानहानीचा दावा करणार : शरद पवार यांचा दाभोलकर करू अशा बातम्या प्रसिद्धी माध्यमांमध्ये आल्यानंतर माझ्यासह कुटुंबाला मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास सहन करावा लागला, अशी प्रतिक्रिया पिंपळकर यांनी दिली आहे. या प्रकरणी तथाकथीत पोस्टला मी कुठल्याच प्रकारचे लाईक केलेले नाही, किंवा प्रसिद्धी दिली नाही. माझ्यावरती हेतुपरस्पर असा दावा करण्यात आला आहे. यामुळे मला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला असल्याचे पिपंळकर यांनी माध्यमांना सांगितले.

सुप्रिया सुळेविरुद्ध मानहाणीचा दावा : सुप्रिया सुळे यांनी ते ट्विट माझ्या नावाने दाखवून माझ्यावर गंभीर आरोप केले होते. माझ्यावर गंभीर आरोप करणाऱ्या सुप्रिया सुळे, रोहित पवार, अमोल मिटकरी, जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे सौरभ पिंपळकरने यावेळी सांगितले. जे ट्विट केले होते त्यामध्ये औरंगजेब हा सुपारी कतरण खात होता, त्याचे तोंड वाकडे होऊन गेले, त्याची इतिहासात पुनरावृत्ती होणार, यात शरद पवारांचे कुठेही नाव नव्हते, असा दावा पिंपळकरने पत्रकार परिषदेत केला आहे.

भाजपा पाठीशी ठाम उभी : प्रसिद्धी माध्यमांमध्ये प्रकरण आल्यानंतर मला प्रचंड त्रास सहन करावा लागला. परंतु या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते माझ्या पाठीशी भरभक्कमपणे उभे होते. विरोधकांनी माझ्यासोबत माझ्या पक्षालाही बदनाम करण्याचा प्रयत्न केला. माझ्यासोबत भारतीय जनता पक्ष खंबीरपणे उभा होता. विरोधकांमुळे माझ्या परिवाराला मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे सुप्रिया सुळे, माझ्या आई-वडिलांची, पक्षाची माफी मागणार का असा प्रश्नसुद्धा सौरभ पिंपळकर यांनी उपस्थित केला.

हेही वाचा - Threats Political Leaders : राजकीय नेत्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्याचे प्रमाण वाढले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.