अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या ( Sant Gadgebaba Amravati University ) सिनेटच्या निवडणुकीसाठी (Senate Elections ) रविवारी झालेल्या मतदानानंतर दिवसभर विभागातील पाचही जिल्ह्यातील मतपत्रिका जुळवणी केल्यावर प्रत्यक्षात रात्री अकरा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. पहाटे तीन वाजेपर्यंत एकूण 19 संवर्गातील निकाल समोर आला. यापैकी 15 जागांवर नुटाचे सदस्य विजयी झाले. सध्या घडीला नुटा ने आघाडी घेतल्याचे चित्र आहे.
असा आहे आतापर्यंतचा निकाल :
व्यवस्थापन परिषद महिला प्रवर्ग - एकूण 44 सदस्य संख्या असणाऱ्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेटमध्ये व्यवस्थापन मंडळ प्रतिनिधी या मतदार संघात महिला प्रवर्गात नोटाच्या डॉक्टर मीनल गावंडे यांना 133 तर डॉक्टर वीरा मांडवकर यांना 78 मते मिळाली या संवर्गात डॉक्टर मीनल गावंडे विजयी झाल्या.
दहा प्राचार्य मतदार संघात - सर्वसाधारण वर्गवारी प्राचार्य डॉक्टर राधेश्याम सिंग ची पहिल्या क्रमांकाची मते घेऊन विजयी झाले तर दुसऱ्या दुसऱ्या क्रमांकाची मते घेऊन डॉक्टर देवेंद्र गावंडे तिसऱ्या क्रमांकावर प्राचार्य डॉक्टर सुनील पांडे, चौथ्या क्रमांकावर प्राचार्य डॉक्टर संजय खेरडे आणि पाचव्या क्रमांकावर प्राचार्य डॉक्टर निलेश गावंडे हे निवडून आले आहेत या मतदारसंघात पाच पैकी डॉक्टर संजय खेरडे हे शिक्षण मंचचे सदस्य अतुल इतर चारही नुटाचे सदस्य आहेत.
व्यवस्थापन प्रतिनिधी मतदारसंघ - व्यवस्थापन प्रतिनिधी मतदार संघात सर्वसामान्य वर्गवारीत क्रमांक एकवर श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि नोटाचे सदस्य असणारे हर्षवर्धन देशमुख विजयी झाले असून दुसऱ्या क्रमांकावर शिक्षण मंचचे उमेदवार डॉक्टर अशोक चव्हाण यांनी बाजी मारली आहे. या प्रवर्गात तिसऱ्या क्रमांकावर नुटाचे रामदेवसरकर विजयी झाले असून चौथ्या क्रमांकावर शिक्षण मंचचे एडवोकेट मोतीसिंग मोहता निवडून आले आहेत.
महाविद्यालयीन शिक्षक एनटी वर्गवारी - दहा महाविद्यालयीन शिक्षक मतदार संघात डीटीएनटी वर्गवारीत शिक्षण मंचच्या नीता गिरी यांना 1113 मत मिळाली तर मुटाचे विजय कापसे यांना 1833 मत मिळाली.
महाविद्यालयीन शिक्षक एसटी वर्गवारी - दहा महाविद्यालयीन शिक्षक मतदार संघात एसटी वर्गवारी लुटाचे हरिदास दुर्वे यांना 1868 मत मिळाली तर शिक्षण मंचचे प्रसाद मडावी यांना 100011 मते मिळाली हरिदास दुर्वे यांना विजयी घोषित करण्यात आले.
अंतिम निकाल दुपारी तीन पर्यंत येण्याची शक्यता : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेट निवडणूक साठी झालेल्या मतदानाची मतमोजणी मंगळवारी रात्री अकरा वाजल्यापासून सुरू झाली आहे. सध्या विविध मंडळाचे निकाल समोर यायला लागले असून विद्यार्थ्यांचे सर्वाधिक लक्ष लागून असणाऱ्या पदवीधर मतदारसंघाचे निकाल अद्याप यायचे आहेत. संपूर्ण निकाल आज दुपारी तीन वाजेपर्यंत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अशी आहे लढत : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठावर नागपूर युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशन अर्थात नुटाचे कायम वर्चस्व राहिले आहे. नुटाच्या विरोधात गत निवडणुकीत पहिल्यांदाच भाजप प्रणित शिक्षण मंच निवडणूक रिंगणात उतरले होते. गत वेळी निवडणुकीत नोटाणे बाजी मारली असली तरी राज्यपाल आणि कुलगुरू नामी सदस्यांमध्ये शिक्षण मंच सदस्यांची संख्या सर्वाधिक होती. यावेळी देखील राज्यपाल नामी सदस्यांमध्ये शिक्षण मंचच्या सदस्यांना मोठ्या संख्येत संधी मिळेल असे बोलले जात असताना प्रत्यक्ष निवडणुकीत नुटाने आघाडी घेतली आहे. पदवीधर मतदार संघात मात्र शिक्षण मंच आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या संयुक्त आघाडीतील उमेदवार नुटाच्या उमेदवारांना टक्कर देतील अशी अपेक्षा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला असून निकाल लागेपर्यंत ही निवडणूक चुरशीची होईल असा अंदाज व्यक्त केला जातो आहे.