अमरावती Rana couple VS Yashomati Thakur : तिवसा येथे मंगळवारी आयोजित दहीहंडी स्पर्धेदरम्यान खासदार नवनीत राणा यांनी बोलताना आमदार यशोमती ठाकूर यांच्यावर गंभीर आरोप केलाय. त्यांनी यशोमती ठाकूर यांनी देखील उत्तर दिलंय. नवनीत राणा म्हणाल्या की, यशोमती ठाकूर लोकसभा निवडणुकीत आमच्या सोबत फिरल्या. आमच्याकडून त्यांनी पैसे खाल्ले, अन् प्रचार मात्र दुसऱ्याचा केलाय. सोन्याच्या ताटात जेवणाऱ्या यशोमती ठाकूर यांच्या मागच्या पिढीनं देखील दिवसा मतदार संघाचं प्रतिनिधित्व केलंय. मात्र, तरीसुद्धा तिवसा मतदारसंघाचा कुठलाही विकास झाला नाही. गरिबांना काही देण्याऐवजी त्या केवळ इनकमिंगलाच महत्त्व देतात, असं देखील खासदार राणा म्हणाल्या. एक महिला म्हणून मला 14 दिवस कारागृहात डांबलं, तेव्हा राज्याच्या महिला विकास मंत्री म्हणून यशोमती ठाकूर एक शब्द देखील बोलल्या नाही, असं देखील नवनीत राणा (Navneet Rana) म्हणाल्या.
रवी राणा यांची टीका : दर्यापूर मतदार संघाचे आमदार बळवंत वानखडे हे चक्क तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या चपला उचलतात. ही बाब अतिशय लाजीरवाणी आहे, अशी टीका तिवसा येथील दहीहंडी स्पर्धेच्या सोहळ्यात आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी केलीय. बळवंत वानखडे हा माझा मोठा भाऊ आहे. तो माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा असून तो माझ्या वडिलांसमान आहे. माझ्या भावाला काही बोललीस तर तुझ्यासह तुझ्या नवऱ्याची, अख्ख्या खानदानाची इज्जत उतरवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देखील आमदार यशोमती ठाकूर यांनी भर सभेत (Yashomati Thakur In Amravati) दिलाय.
यशोमती ठाकूर यांचं उत्तर : तिवसा मतदार संघातील प्रत्येक माणसाला माझे काका आणि बाबा माहीत आहेत. माझ्या कुटुंबियांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला. मात्र, तिवसा मतदार संघातील तमाम लोकं माझ्यासोबत होते आणि आहेत. खासदार नवनीत राणा यांनी माझा बाप काढला तर त्यांची चमडी सोलून काढू, असं प्रत्युत्तर आमदार यशोमती ठाकूर यांनी कुऱ्हा येथे आयोजित काँग्रेसच्या जनसंवाद सभेच्या समारोपीय सोहळ्यात राणा दांपत्याला दिलंय.
नवनीत राणा यांच्यावर टीका : आम्ही वहिनी म्हणून तुमचा आदर केला. मात्र, त्या आज जे काही करीत आहे, ते योग्य नाही. अमरावतीत हर्मन कंपनी त्यांनी आणल्याचं खासदार नवनीत राणा सांगत आहेत. त्या किती खोटं बोलतात, हे सर्वांनाच ठाऊक आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना अमरावतीत हरमन कंपनीला मान्यता मिळालीय. हर्मन कंपनीचा मालक हा काँग्रेसचा आहे. आणखी किती खोटं बोलाल, असा सवाल देखील आमदार यशोमती ठाकूर यांनी केलाय. 'तू असशील गोरी आणि मी डोमडी, हम काले है तो क्या हुआ दिलवाले है' असा टोमणा देखील आमदार यशोमती ठाकूर यांनी खासदार नवनीत राणा यांनी यावेळी लगावलाय.
हेही वाचा :