ETV Bharat / state

अमरावती जिल्ह्यात पावसाची रिपरिप; शेतकरी वर्गातून समाधान - अमरावतीमध्ये पावसाची रिपरिप

जिल्ह्यातील खरीप हंगामाची कामे पूर्ण झाली असून शेतकऱ्यांना पावसाच्या झडीची प्रतीक्षा होती. त्यातच रविवारी झालेल्या मान्सूनच्या पहिल्याच मुसळधार पावसानंतर सलग चार दिवस पावसाने दांडी मारली. त्यानंतर आज पहाटेपासून पावसाच्या सरी बरसू लागल्या आहेत.

rainfall in amravati district
अमरावती जिल्ह्यात पावसाची रिपरिप; शेतकरी वर्गातून समाधान
author img

By

Published : Jun 19, 2020, 7:34 AM IST

Updated : Jun 19, 2020, 10:31 AM IST

अमरावती - मान्सून पावसाने महाराष्ट्र व्यापला असून जिल्ह्यातही पावसाचे दमदार आगमन झाले आहे. आज (शुक्रवार) पहाटेपासून शहर आणि लगतच्या परिसरात पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. या संततधार पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण होण्यास मदत होणार असून शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील खरीप हंगामाची कामे पूर्ण झाली असून शेतकऱ्यांना पावसाच्या झडीची प्रतीक्षा होती. त्यातच रविवारी झालेल्या मान्सूनच्या पहिल्याच मुसळधार पावसानंतर सलग चार दिवस पावसाने दांडी मारली. त्यानंतर आज पहाटेपासून पावसाच्या सरी बरसू लागल्या आहेत. हा पाऊस दिवसभर राहण्याची शक्यता आहे. अमरावती शहरासोबतच चांदूररेल्वे, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, अचलपूर आणि मेळघाटातही पाऊस बरसत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

Last Updated : Jun 19, 2020, 10:31 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.