अमरावती - राहुल गांधींनी सावरकरांसंदर्भात केलेल्या वक्तव्याचे देशभर पडसाद उमटत आहेत. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहरात भाजप कार्यकर्त्यांनीही याचा निषेध केला. यावेळी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
हेही वाचा - पंचायत समिती सभापती निवड: तिवसा, धामणगाव रेल्वेत काँग्रेस तर चांदूर रेल्वेत भाजप
सोमवारी अमरावतीच्या परतवाडा शहरातील जयस्तंभ चौकात भाजप कार्यकर्त्यांनी "होय मी सावरकर" असा मजकूर लिहलेल्या पाट्या दाखवत राहुल गांधी यांच्या वक्तव्यचा निषेध केला. सावरकरांवर केलेल्या विधानाबद्दल राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केली.
हेही वाचा - पोहरा जंगलात 'रन फॉर ब्रेव्ह'; राज्य राखीव पोलीस दलाचे आयोजन
सोमवारपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली. यावेळी भाजपसह मित्रपक्षांनी 'मी पण सावरकर' नावच्या टोप्या घालून विधानभवनाच्या पायऱ्यांवर राहुल गांधींविरोधात घोषणा दिल्या.