ETV Bharat / state

अमरावती विभाग: विधानसभा मतदारसंघाचा आढावा - bachhu kadu, ravi rana letest news

जिल्ह्यात एकूण आठ मतदारसंघ आहेत. यामध्ये अमरावती, बडनेरा, धामणगाव रेल्वे, तिवसा, मोर्शी, अचलपूर आणि मेळघाट मतदारसंघाचा यात समावेश आहे. जिल्ह्यातील 8 पैकी 4 भाजप तर दोन मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात आहेत. दोन मतदारसंघांत अपक्ष आमदार आहेत. 2019 च्या निवडणुकीत जिल्ह्यातील राजकीय चित्र नेमके कसे असणार, विद्यमान आमदारांना मतदार पुन्हा संधी देणार का, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

अमरावती विभाग: विधानसभा मतदार संघाचा आढावा
author img

By

Published : Sep 21, 2019, 12:29 PM IST

अमरावती- जिल्ह्यात एकूण आठ मतदारसंघ आहेत. यामध्ये अमरावती, बडनेरा, धामणगाव रेल्वे, तिवसा, मोर्शी, अचलपूर आणि मेळघाट मतदारसंघाचा यात समावेश आहे. जिल्ह्यातील 8 पैकी 4 भाजप तर दोन मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात आहेत. दोन मतदारसंघांत अपक्ष आमदार आहेत. 2019 च्या निवडणुकीत जिल्ह्यातील राजकीय चित्र नेमके कसे असणार, विद्यमान आमदारांना मतदार पुन्हा संधी देणार का, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

अमरावती विभाग: विधानसभा मतदारसंघाचा आढावा
अमरावती विधानसभा मतदार संघातील राजकारण पाहता भाजपचे विद्यमान आमदार डॉक्टर सुनील देशमुख यांना मतदार पुन्हा एकदा संधी देतील, असे चित्र पाहायला मिळत आहे. देशमुख यांच्या विरोधात यावेळी रावसाहेब शेखावत निवडणूक लढण्यास इच्छुक नाहीत. अमरावती मतदारसंघ हा काँग्रेसचा महत्वाचा मतदारसंघ आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके यांनी अमरावती मतदारसंघ काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडावा यासाठी फिल्डिंग लावली आहे. दरम्यान, काँग्रेसने अमरावती मतदारसंघात काँग्रेसचाच उमेदवार असावा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुलभा खोडके आम्हाला चालणार नाहीत, अशा आशयाचे पत्र थेट सोनिया गांधींना पाठविले आहे. या मतदारसंघातील परिस्थिती पहाता विद्यमान आमदार डॉ. सुनील देशमुख यांच्याविरोधात सध्यातरी एकही तगडा उमेदवार नाही. गेल्या निवडणुकीत एकूण 39 हजार मतांनी देशमुख विजयी झाले होते. यावेळी मताधिक्य निश्चितच वाढणार असल्याचा दावा ते करत आहेत. निवडणुकीत यावेळी देशमुखांसमोर नेमके कोणाचे आव्हान असणार यावरही बरेचसे चित्र अवलंबून आहे. सध्यातरी तेच आघाडीवर असल्याचे मानले जात आहे. पूर्णतः शहरी भाग असणाऱ्या अमरावती मतदारसंघात एकूण 3 लाख 38 हजार 741 मतदार आहेत. यापैकी 1 लाख 74 हजार 57 पुरुष, 1 लाख 64 हजार 671 महिला आणि 13 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील बडनेरा मतदारसंघ हा निवडणूक काळात सर्वाधिक चर्चेत राहणारा मतदारसंघ आहे. विद्यमान आमदार रवी राणा येणाऱ्या निवडणुकीत हॅटट्रिक साधणार असल्याचा दावा करत आहेत. राणा यांच्या कट्टर विरोधक सुलभा खोडके यावेळी अमरावती मतदारसंघातुन निवडणूक लढवण्याची तयारी करीत आहे. त्यामुळे राणा यांची बाजू मजबूत वाटत असली तरीही भाजप आणि शिवसेनेच्या युतीनंतर ही जागा शिवसेनेसाठी सुटल्यास दिवंगत माजी आमदार संजय बंड यांच्या पत्नी प्रीती बंड या शिवसेनेच्या उमेदवार असु शकतात. असे झाले तरच बडनेरा मतदार संघात अतिशय चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. बडनेरा मतदारसंघ एकूण तीन लाख 48 हजार 935 मतदार असून पुरुष मतदारांची संख्या 1 लाख 77 हजार 969 आहे तर महिला मतदारांची संख्या 1 लाख 70 हजार 952 ईतकी आहे. यात 14 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.

धामणगाव मतदार संघावर गेल्या दोन निवडणुकांपासून काँग्रेसचे वर्चस्व आहे. धामणगाव रेल्वेसह चांदुर रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर या तालुक्यांत हा मतदारसंघ विखुरला आहे. वीरेंद्र जगताप हे धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे आमदार आहेत. या निवडणुकीत जगताप यांच्या जवळच्या युवा कार्यकर्त्यांची मोठी फळी त्यांच्यापासून दुरावली आहे. कारण, त्यांचे अतिशय विश्वासु म्हणून ओळखले जाणारे निलेश विश्वकर्मा यांनी गेल्या वर्षभरापासून जनसंपर्क वाढवला आहे. त्यांचा स्वत:चा मोठा गट सक्रीय आहे. भाजप कोणाला उमेदवारी देणार याची प्रतीक्षा मतदारांना आहे. विधानपरिषद सदस्य अरुण आडसुळ यांचा मुलगा प्रताप आणि डॉ.नितीन धांडे या दोघांनी भाजपकडे उमेदवारी मागितली आहे. यांपैकी कोणाला उमेदवारी भेटेल हे अद्याप स्पष्ट व्हायचे आहे. मतदारसंघात एकूण 3 लाख 88 हजार 78 मतदार असून पुरुष मतदारांची संख्या 1 लाख 57 हजार 436 एवढी असून 1 लाख 51 हजार 437 महिला मतदारांची संख्या आणि आणि पाच तृतीयपंथी मतदार धामणगाव रेल्वे मतदारसंघात आहे.

अमरावती जिल्ह्यात तिवसा मतदारसंघ हा सध्या चांगलाच चर्चेत आलेला आहे. काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष आमदार यशोमती ठाकूर या तिवसा मतदार मतदार संघाचे दुसऱ्यांदा नेतृत्व करीत आहे तिवसा मतदार संघ काहीही करून भाजप व्हावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती जिल्ह्याचे माजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांना आमदार यशोमती ठाकूर यांच्याविरोधात लढण्यास सांगितले असल्याचे बोलल्या जात आहे. विशेष म्हणजे प्रवीण पोटे यांनी तिवसा मतदार संघात आपल्या खास कार्यकर्त्यांकडून चाचपणी सुरू केली आहे. प्रवीण पोटे आणि आमदार यशोमती ठाकूर यांचे सलोख्याचे संबंध आजवर पाहायला मिळाले असे असताना आता आमदार यशोमती ठाकूर यांच्याविरोधात प्रवीण पोटे यांच्यात होणारी लढत संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधणारी ठरू शकते. असे असले तरी तिवसा मतदारसंघात निवडणूक लढण्यासाठी गेल्या पाच वर्षापासून तयारी करीत असलेल्या निवेदिता दिघडे चौधरी आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांचे काय असा सवालही भाजप कार्यकर्ते उपस्थित करीत आहेत. तिवसा मतदारसंघ हा अमरावती, चांदुर रेल्वे, चांदुर बाजार, मोर्शी आणि भातकुली अशा पाच तालुक्यांमध्ये विस्तारलेला आहे. मतदारसंघात एकूण 2 लाख 90 हजार 207 मतदार आहेत. यापैकी एक लाख 48 हजार 918 पुरुष तर 1 लाख 41 हजार 229 महिला मतदार आहेत.

महाराष्ट्राचे कृषी राज्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अनील बोंडे यांचा मोर्शी हा मतदारसंघ आहे. बोंडे यांची राज्य मंत्रिमंडळात वर्णी लागल्यामुळे मतदारसंघाचे चित्र गेल्या चार वर्षांच्या तुलनेत बदलले आहे. त्यांच्यासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवेंद्र भुयार यांचे कडवे आव्हान असणार आहे. भुयार यांची लोकप्रियता पाहता बोंडे यांना राज्यमंत्री म्हणून मिळालेले बळ ही मोठी संजीवनी ठरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम ठाकरे निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत असून मतदारसंघात लढत अतिशय चुरशीची होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात वरूड आणि मोर्शी अशा दोन तालुक्यांचा समावेश होतो. या मतदारसंघात एकूण 2 लाख 81 हजार 248 मतदार आहेत. यापैकी पुरुष मतदारांची संख्या एक लाख 47 हजार 569 तर महिला मतदारांची संख्या एक लाख 37 हजार 722 ईतकी असून दोन तृतीयपंथी मतदार आहेत.

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. सध्या भाजपचे रमेश बुंदिले हे येथून आमदार आहेत. गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे अभिजित अडसूळ यांचा रमेश बंदीले यांनी पराभव केला होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी पुन्हा एकदा मुलाखत दिली आहे. बुंदिले यांच्याऐवजी भाजपची उमेदवारी आपल्याला मिळावी यासाठी पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड महपालिका स्थायी समितीच्या माजी सभापती सिमा सावळे या लोकसभा निवडणुकीपासून मतदारसंघात ठाण मांडून आहेत. रिपाईचे बळवंत वानखडे अतिशय तागडे उमेदवार समजले जातात. गेल्या दोन निवडणूकांत ते सलग दुसऱ्या स्थानावर राहिले आहेत. खासदार नवनीत राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष यावेळी या जागेवर उमेदवार देणार आहे. बळवंत वानखडे यांना बळ देण्याच्या तयारीत युवा स्वभिमान असल्याने दर्यापूर मतदार संघातही चुरशीची लढत पहायला मिळनार आहे.

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू हे गेल्या तीन निवडणुकांपासून अपक्ष आमदार म्हणुन निवडुण येत आहेत. आज आमदार बच्चू कडू यांची ख्याती राज्यभर पसरली आहे. दर्यापूर आणि अंजनगाव सुर्जी अशा दोन तालुक्यांचा या मतदारसंघात समावेश आहे. येथे एकूण दोन लाख 89 हजार 312 मतदार असून एक लाख 52 हजार 466 पुरुष तर 1 लाख 39 हजार 641 महिला मतदार आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात भाजप कोणता तगडा उमेदवार देणार किंवा काँग्रेसच्या बबलू देशमुख यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते किती प्रामाणिकपणे साथ देणार, यावर अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे चित्र अवलंबून आहे. 2014 च्या निवडणुकीत बच्चू कडू हे अवघ्या दहा हजार मतांच्या फरकाने निवडून आले होते.

अनुसूचित जमातीसाठी राखीव असणारा अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा मतदारसंघ आहे. सध्या भाजपचे प्रभुदास भिलावेकर हे आमदार आहेत. 2014 च्या निवडणूकीत मोदी लाटेचा खरा परिणाम हा मेळघाटात पहायला मिळाला. पंचायत समिती सदस्य असणाऱ्या प्रभुदास भिलवेकर यांना मतदारांनी आमदार म्हणून निवडुन दिले होते. परंतु त्यांनी गेल्या पाच वर्षांत न्याय दिला नसल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेसुध्दा हे मान्य करतात. यामुळे 2019 च्या निवडणुकीत भाजपचा उमेदवार बदलण्याची शक्यता आहे. यापूर्वी दोन वेळा मेळघाटचे प्रतिनिधीत्व करणारे राजकुमार पटेल हे गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते. आता राजकुमार पटेल हे भाजपवासी झाले आहेत. येणाऱ्या निवडणुकीत भाजप आपल्याला उमेदवारी देईल अशी त्यांना आशा आहे. दरम्यान भाजपच्या उमेदवारीसाठी रमेश मावस्कर हे सुद्धा इच्छुक आहेत. केवलराम काळे हे काँग्रेसचे उमेदवार असतील हे निश्चित असताना भिलावेकर यांना पक्ष उमेदवारी देईल की नाही, याबाबत मात्र शंका उपस्थित केली जात आहे. धारणी आणि चिखलदारा अशा दोन तालुक्यांत विस्तारलेल्या मेळघाट मतदारसंघात एकूण 2 लाख 65 हजार 832 मतदार आहेत. यापैकी पुरुष मतदारांची संख्या एक लाख 41 हजार 483 तर एक लाख 30 हजार 667 महिला मतदार आहेत.

अमरावती जिल्ह्यातील आठही मतदारसंघांत विधानसभा निवडणुक रंगतदार होणार आहे. धामणगाव रेल्वे आणि तिवसा मतदार संघात काँग्रेसचे आमदार असून याठिकाणी भाजप आपला झेंडा फडकवण्यासाठी सर्व शक्ती लावण्याच्या तयारीत आहे. रवी राणा आणि बच्चू कडू या अपक्ष आमदारांची जादू 2019 मध्येही चालणार का, याची उत्सुकताही अमरावती जिल्ह्यातील मतदारांना आहे.

Intro:( ही बातमी लगेच वापरु नये. निवडणूक जाहीर झाल्यावर या बातमीचा विचार करावा)

अमरावती जिल्ह्यात विधानसभेचे एकूण आठ मतदारसंघ आहेत यामध्ये अमरावती, बडनेरा ,धामणगाव रेल्वे, तिवसा ,मोर्शी, अचलपूर, आणि मेळघाट मतदारसंघाचा समावेश आहे जिल्ह्यातील आठ पैकी चार मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत तर दोन मतदारसंघात काँग्रेसचे आणि दोन मतदार संघात अपक्ष आमदार आहेत. 2019 च्या निवडणुकीत जिल्ह्यातील राजकीय चित्र नेमके कसे असणार,विद्यमान आमदारांना मतदार पुन्हा संधी देणार का,किंवा कोणत्या मतदार संघात बदल घडलेला दिसेल याची उत्सुकता आता लागली आहे.

Body:अमरावती विधानसभा मतदार संघातील राजकारण पहाता भाजपचे विद्यमान आमदार डॉक्टर सुनील देशमुख यांना पुन्हा एकदा मतदार संधी देतील असे चित्र आज तरी पाहायला मिळते आहे. वास्तवात डॉ. सुनील देशमुख यांच्या विरोधात यावेळी रावसाहेब शेखावत निवडणूक लढण्यास इच्छुक नाहीत. अमरावती मतदारसंघ हा काँग्रेसचा महत्वाचा मतदारसंघ आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके यांनी अमरावती मतदारसंघ ह्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस साठी सोडावा यासाठी फिल्डिंग लावली आहे .दरम्यान अमरावती शहर काँग्रेसने अमरावती मतदार संघात काँग्रेसचाच उमेदवार असावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुलभा खोडके आम्हाला चालणार नाही. अशा आशयाचे पत्र थेट काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठविले आहे. अमरावती विधानसभा मतदार संघाची परिस्थिती पहाता विद्यमान आमदार डॉ. सुनील देशमुख यांच्याविरोधात सध्यातरी एकही तगडा उमेदवार नाही. गेल्या निवडणुकीत एकूण 39 हजाराच्या वर मतांनी डॉक्टर सुनील देशमुख विजयी झाले होते. यावेळी वेळेचे मताधिक्य निश्चितच वाढणार असल्याची आशा आमदार डॉ. सुनील देशमुख यांना आहे .निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाल्यावर आमदार डॉ. सुनील देशमुख यांना नेमके आव्हान कोणाचे असणार. यावरही ही निवडणुकीचे चित्र बरेचसे स्पष्ट होणारे ठरेल .सध्यातरी डॉक्टर सुनील देशमुख यांची बाजू ही तगडी समजली जात आहे.
पूर्णतः शहरी भाग असणाऱ्या अमरावती मतदारसंघात एकूण 3 लाख 38 हजार 741 मतदार आहेत. यापैकी एक लाख 74 हजार 57 पुरुष आणि एक लाख 64 हजार 671 महिला व 13 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.
अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदारसंघ हा निवडणूक काळात सर्वाधिक चर्चेत राहणारा मतदारसंघ आहे .विद्यमान आमदार रवी राणा येणाऱ्या निवडणुकीत हॅटट्रिक साधणार असे जाहीर जाहीररीत्या बोलत आहेत. बडनेरा मतदार संघात आमदार रवी राणा यांच्या कट्टर विरोधक सुलभा खोडके यावेळी अमरावती मतदारसंघात निवडणूक लग्नाची तयारी करीत आहे .आमदार रवी राणा यांची बाजू चांगलीच मजबूत आहे असे असले तरी भाजप आणि शिवसेनेची युती झाली आणि युतीची जागा शिवसेनेसाठी सुटल्यावर शिवसेनेच्या उमेदवार दिवंगत माजी आमदार संजय बंड यांच्या पत्नी प्रीती बंड या राहिल्या तरच बडनेरा मतदार संघात अतिशय चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.
बडनेरा मतदारसंघ एकूण तीन लाख 48 हजार 935 मतदार असून पुरुष मतदारांची संख्या एक लाख 77 हजार 969 आहे तर महिला मतदारांची संख्या 170000 952 आणि तृतीयपंथी मतदारांची संख्या 14 आहे.
धामणगाव मतदार संघावर गेल्या दोन निवडणुकीपासून काँग्रेसचा झेंडा फडकतो आहे वीरेंद्र जगताप हे धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे आमदार आहेत या निवडणुकीत आमदार वीरेंद्र जगताप यांच्या अतिशय जवळची असणारी युवकांची फळी त्यांच्यापासून दुरावली आहे आमदार वीरेंद्र जगताप यांचे खास कार्यकर्ते म्हणून ओळख असणारे निलेश विश्वकर्मा यांनी गेल्या वर्षभरापासून जनसंपर्क वाढविला आहे. धामणगाव रेल्वे मतदारसंघात भाजप कोणाला उमेदवारी देणार याची प्रतीक्षा मतदारांना आहे विधानपरिषद सदस्य अरुण आडसुळ यांचा मुलगा प्रताप अडसळ आणि डॉ.नितीन धांडे या दोघांनी भाजपकडे उमेदवारी मागितली आहे. या दोघांपैकी भाजप कोणाला उमेदवारी देईल हे अद्याप स्पष्ट व्हायचे आहे.
धामणगाव रेल्वे, चांदुर रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर तालुका असा धामणगाव रेल्वे मतदारसंघ विखुरला आहे धामणगाव रेल्वे मतदारसंघात एकूण तीन लाख 88 हजार 78 मतदार असून पुरुष मतदारांची संख्या एक लाख लाख 57 हजार 436 तर महिला मतदारांची संख्या एक लाख 51 हजार 437 आणि आणि पाच तृतीयपंथी मतदार धामणगाव रेल्वे मतदारसंघात आहे.
अमरावती जिल्ह्यात यात सध्या तिवसा मतदार संघ हा चांगलाच चर्चेत आलेला मतदारसंघ आहे काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष आमदार यशोमती ठाकूर या तिवसा मतदार मतदार संघाचे दुसऱ्यांदा नेतृत्व करीत आहे तिवसा मतदार संघ काहीही करून भाजप व्हावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती जिल्ह्याचे माजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांना आमदार यशोमती ठाकूर यांच्याविरोधात लढण्यास सांगितले असल्याचे बोलल्या जात आहे. विशेष म्हणजे प्रवीण पोटे यांनी तिवसा मतदार संघात आपल्या खास कार्यकर्त्यांकडून चाचपणी सुरू केली आहे. प्रवीण पोटे आणि आमदार यशोमती ठाकूर यांचे सलोख्याचे संबंध आजवर पाहायला मिळाले असे असताना आता आमदार यशोमती ठाकूर यांच्याविरोधात प्रवीण पोटे यांच्यात होणारी लढत संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधणारी ठरू शकते. असे असले तरी तिवसा मतदारसंघात निवडणूक लढण्यासाठी गेल्या पाच वर्षापासून तयारी करीत असलेल्या निवेदिता दिघडे चौधरी आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांचे काय असा सवालही भाजप कार्यकर्ते उपस्थित करीत आहेत..
तिवसा मतदार संघ हा तिवसा, अमरावती,चांदुर रेल्वे, चांदुर बाजार ,मोर्शी,आणि भातकुली अशा पाच तालुक्यांमध्ये विस्तारलेला मतदारसंघ आहे. या मतदारसंघात एकूण 200000 लाख 90 हजार 207 मतदार आहेत यापैकी पुरुष मतदारांची संख्या एक लाख 48 हजार 918 तर महिला मतदारांची संख्या एक लाख 41 हजार 229 इतकी आहे.
महाराष्ट्राचे कृषी राज्यमंत्री आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अनील बोंडे यांचा मोर्शी हा मतदारसंघ आहे. डॉअनिल बोंडे यांची राज्य मंत्रिमंडळात वर्णी लागल्यामुळे मोर्शी मतदारसंघाचे चित्र गेल्या चार वर्षांच्या तुलनेत बदलले आहे. मोर्शी मतदार संघात शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे देवेंद्र भुयार हे डॉ. अनिल बोंडे यांच्यासमोर कडवे आव्हान म्हणून उभे ठाकणार आहेत देवेंद्र भुयार यांची लोकप्रियता पाहता डॉ. अनिल बोंडे यांना राज्यमंत्री म्हणून मिळालेले बळ ही मोठी संजीवनी ठरली आहे. देवेंद्र भुयार यांच्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम ठाकरे निवडणूक रिंगणात निवडणूक उतरण्याच्या तयारीत असून मोर्शी विधानसभा मतदार संघात अतिशय चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.
वरूड आणि मोर्शी अशा दोन तालुक्यांचा समावेश असणाऱ्या या मतदारसंघात एकूण दोन लाख 81 हजार 248 मतदार आहेत. यापैकी पुरुष मतदारांची संख्या एक लाख 47 हजार 569 महिला मतदारांची संख्या एक लाख 37 हजार 722 असून दोन तृतीयपंथी मतदार मोर्शी मतदार संघात आहेत.
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव असणारा मतदारसंघ आहे. सध्या भाजपचे रमेश बुंदिले हे दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार अभिजित अडसूळ यांचा रमेश बंदीले यानी दारुण पराभव केला होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठी यांनी पुन्हा एकदा दर्यापूर मतदार संघासाठी मुलाखत दिली आहे. आमदार रमेश बुंदिले यांच्याऐवजी भाजपची उमेदवारी आपल्याला मिळावी यासाठी पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड महपालिका स्थायी समितीच्या माजी सभापती सिमा सावळे या लोकसभा निवडणुकीपासून दर्यापूर मतदार संघात ठाण मांडून्ं आहेत. रिपाईचे बळवंत वानखडे हे दर्यापूर मतदार संघात अतिशय तागडे उमेदवार आहेत. गत दोन निवडणूकीत ते सलग दुसऱ्या स्थानवर राहिले आहेत. या निवडणुकीत खासदार नवनीत राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचा उमेदवार दर्यापूर मतदारसंघात राहणार आहे बळवंत वानखडे यांनाच बळ देण्याच्या तयारीत युवस्वभिमान असल्याने दर्यापूर मतदार संघातही चुरशीची लढत पहायला मिळनार आहे.
दर्यापूर आणि अंजनगाव सुर्जी असे दोन तालुके मिळून असणाऱ्या दर्यापूर मतदारसंघात एकूण दोन लाख 89 हजार 312 मतदार असून पुरुष मतदारांची संख्या एक लाख 52 हजार 466 महिला मतदारांची संख्या 1 लाख 39 हजार 641 तर दोन तृतीय पंथी मतदार दर्यापूर मतदारसंघात आहेत.
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदारसंघावर गेल्या तीन निवडणुकांपासून अपक्ष आमदार बच्चू कडू यांचे वर्चस्व आहे. आज आमदार बच्चू कडू यांची खाती राज्यभर पसरली आहे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात भाजप कोणता तगडा उमेदवार देणार किंवा काँग्रेसच्या बबलू देशमुख यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस चे कार्यकर्ते किती प्रामाणिकपणे साथ देणार यावर अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे चित्र अवलंबून आहे. 2014 च्या निवडणुकीत बच्चू कडू हे अवघ्या दहा हजार मतांच्या फरकाने निवडून होते.
अचलपूर आणि चांदूरबाजार असे दोन तालुके मिळून अचलपूर मतदार संघ संघात दोन लाख 67 हजार आठ मतदार असून यापैकी पुरुष मतदारांची संख्या 1 लाख 40 हजार 197 तर महिला मतदारांची संख्या एक लाख 30 हजार 124 तृतीयपंथी मतदार आहेत.
अनुसूचित जमातीसाठी राखीव असणारा अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा मतदारसंघ आहे. सध्या या मतदारसंघात भाजपचे प्रभुदास भिलावेकर हे आमदार आहेत. 2014च्या निवडणूकीत मोदी लाटेचा खरा परिणाम हा मेळघातत पहायला मिळाला. पंचायत समिती सदस्य असणाऱ्या प्रभुदास भिलवेकर यांना मेळ्घाट च्या मतदारांनी आमदार म्हणून संधी दिली. मेळघाटचे आमदार म्हणून प्रभुदास भिलावेकर यांनी मात्र गेल्या पाच वर्षात मे घातला कुठलाही न्याय दिला नाही हे वास्तव आहे याबाबत भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते हे मान्य करतात .यामुळे 2019 च्या निवडणुकीत भाजपचा उमेदवार बदलण्याची शक्यता आहे यापूर्वी दोन वेळा भाजपचे आमदार म्हणून मेघाचे प्रतिनिधीत्व करणारे राजकुमार पटेल हे गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते. आता राजकुमार पटेल हे पुन्हा एकदा भाजपने सक्रिय झाले आहेत येणाऱ्या निवडणुकीत भाजप आपल्याला उमेदवारी देईल अशी त्यांना आशा आहे दरम्यान भाजपच्या उमेदवारीसाठी रमेश मावस्कर हेसुद्धा इच्छुक आहेत. केवलराम काळे हे काँग्रेसचे उमेदवार असतील हे निश्चित असताना मेळघाटचे आमदार प्रभुदास भिलावेकर यांना पक्ष उमेदवारी देईल की नाही याबाबत मात्र शंका उपस्थित केली जात आहे.
धारणी आणि चिखलदारा अशा दोन तालुक्यात विस्तारलेल्या मेळघाट मतदारसंघात मतदारांची संख्या एकूण 2 लाख 65 हजार 832 आहे यापैकी पुरुष मतदारांची संख्या एक लाख 41 हजार 483 तर महिला मतदारांची संख्या एक लाख 3667 आणि तृतीयपंथी मतदारांची संख्या तीन इतकी आहे.
एकूण अमरावती जिल्ह्यातील आठही मतदारसंघात विधानसभा निवडणुकी रंगतदार होणार आहे.धामणगाव रेल्वे आणि तिवसा मतदार संघात काँग्रेसचे आमदार असून याठिकाणी भाजप आपला झेंडा फडकवण्यासाठी सर्व शक्ती लावण्याच्या तयारीत आहे. रवी राणा आणि बच्चू कडू या अपक्ष या अपक्ष आमदारांची जादू 2019 मध्येही चालणार का ? याची उत्सुकताही अमरावती जिल्ह्यातील मतदारांना आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.