ETV Bharat / state

नागपूर-औरंगाबाद महामार्गावर अमरातीजवळ अपघात; एकाचा जागीच मृत्यू - अमरावतीमधील चांदुररेल्वे

नागपूर-औरंगाबाद महामार्गावर अमरावतीमधील चांदुररेल्वे तालुक्याजवळ एकाच दिवशी दोन अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. रविवारी रात्री झालेल्या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

नागपूर औरंगाबाद महामार्गावर अमरातीजवळ अपघात, एकाचा जागीच मृत्यू
author img

By

Published : Aug 19, 2019, 10:39 AM IST

अमरावती - नागपूर-औरंगाबाद महामार्गावर उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रेलरला एका दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली. जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यात रविवारी रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.

नागपूर औरंगाबाद महामार्गावर अमरातीजवळ अपघात, एकाचा जागीच मृत्यू

सचिन प्रभाकर सरकटे, असे मृताचे नाव आहे. ट्रेलर नागपूरवरून औरंगाबादकडे जात असताना घुईखेडजवळील चंद्रभागा नदीजवळ पंक्चर झाला. त्यामुळे तो ट्रेलर त्याचठिकाणी उभा होता. रविवारी रात्री सचिन सरकटे घुईखेडवरून जवळा येथे जाण्यासाठी निघाले. त्यावेळी अंधरामध्ये ट्रेलर न दिसल्याने त्यांनी मागील बाजूने ट्रेलरला धडक दिली. त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर जवळपास एका तासापर्यंत महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. तळेगाव दशासर पोलीसांनी घटनेचा पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली. एकाच दिवसातील हा दुसरा अपघात आहे.

Intro:

नागपुर - औरंगाबाद हायवेवर पुन्हा अपघात घुईखेडजवळ उभ्या ट्रेलरला दुचाकीची धडक

दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यु, हायवेवर ट्रॉफीक जाम

अमरावती अँकर

अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यासाठी रविवार अपघात "वार" ठरला असुन एकाच दिवशी नागपुर - औरंगाबाद एक्सप्रेस हायवेवर दुसरा अपघात झाला आहे. नादुरूस्त असलेल्या उभ्या ट्रेलरला मागच्या बाजुने एका दुचाकीने जबर धडक दिली असुन यामध्ये दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यु झाल्याची घटना रविवारी रात्री ९.४५ वाजताच्या दरम्यान घडली. सचिन प्रभाकर सरकटे असे मृतकाचे नाव आहे.

एमएच ४६ एआर ४२५६ क्रमांकाचा ट्रेलर लोहा घेऊन नागपुर वरून औरंगाबादकडे जात असतांना घुईखेड जवळील चंद्रभागा नदीजवळच्या शरद गुल्हाणे यांच्या शेतासमोर समोरील चाक पंक्चर झाला. रविवारी सायंकाळी ४ वाजतापासुन हा ट्रेलर त्याच ठिकाणी उभा होता. अशातच रात्री ९.४५ वाजताच्या दरम्यान चांदूर रेल्वे तालुक्यातील जवळा येथील सचिन प्रभाकर सरकटे हा युवक एमएच ३२ जी ५८७६ क्रमांकाच्या दुचाकीने
घुईखेडवरून जवळा येथे हायवेवरून जाण्यास निघाला असता या उभ्या ट्रेलरला मागच्या बाजुने जबर धडक दिली. ही धडक एवढी भयानक होती की, सचिन सरकटे याचा जागीच मृत्यु झाला. या अपघातानंतर जवळपास एका तासापर्यंत हायवेवरील वाहतुक ठप्प झाली आहे. दुरदुरपर्यंत वाहनांच्या रांगा दोन्ही बाजुने लागल्या होत्या. तळेगाव दशासर पोलीसांनी घटनेचा पंचनामा करून त्यानंतर वाहतुक सुरळीत करून दिली.

Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.