अमरावती - जिल्ह्याच्या अनेक ठिकाणी पावसाचा लपंडाव सुरू आहे. मागील आठवडाभर संततधार बरसलेल्या पावसाने आज विश्रांती घेतली आहे.
काल (सोमवार) सायंकाळच्या सुमारास पावसाने धुवाधार बॅटिंग केली होती. या पावसामुळे दुष्काळी भागातील अप्पर वर्धा आणि लोवर वर्धा धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.