ETV Bharat / state

खासदार नवनीत राणांनी दांडिया प्रशिक्षणात गरब्याच्या तालावर धरला ठेका

नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात युवती आणि महिलांसाठी दांडीया नृत्याचं प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं आहे. या प्रशिक्षणात अमरावतीच्या नवनिर्वाचित खासदार नवनीत राणा यांनीही हजेरी लावली. तसंच या प्रशिक्षणात सहभाग घेत त्यांनीही गरब्याच्या तालावर ठेका धरला.

author img

By

Published : Sep 27, 2019, 3:23 PM IST

खासदार नवनीत राणांनी दांडिया प्रशिक्षनात गरब्याच्या तालावर धरला ठेका

अमरावती - येत्या २९ तारखेपासून देशभरात नवरात्रोत्सव सुरू होत आहे. या काळात अमरावती शहरात मोठ्या प्रमाणावर गरबा आणि दांडीया नृत्याच्या धमाल कार्यक्रमाचे मोठ्या प्रमाणावर आयोजन केल्या जाते. त्यासाठी जिल्ह्यात सर्वत्र युवती, महिलांना खास प्रशिक्षण आयोजित केलं आहे. येथील 'रचना नारी मंच'ने दांडीया नृत्याच्या प्रशिक्षणाचं आयोजन केलं आहे. या प्रशिक्षणात अमरावतीच्या नवनिर्वाचित खासदार नवनीत राणा यांनीही हजेरी लावली. तसंच या प्रशिक्षणात सहभाग घेत त्यांनीही गरब्याच्या तालावर ठेका धरला.

खासदार नवनीत राणांनी दांडिया प्रशिक्षनात गरब्याच्या तालावर धरला ठेका

अनेक महिलांनाही या दांडिया नृत्याचा आनंद घेतला. या कार्यक्रमाचा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय आहे. लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचा दणदणीत पराभव करणाऱ्या खासदार नवनीत कौर राणा भाजप प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या.

हेही वाचा -'कौन बनेगा करोडपती' जिंकलेल्या बबिताताईंची अंजनगाव सुर्जीत विजय रॅली

दरम्यान, नवनीत राणा या नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असतात. कधी वारकऱ्यांसोबत विठू नामाचा गजर, तर कधी सोयाबीनची पेरणी केली अश्या कामांमुळे त्या नेहमी चर्चेचा विषय ठरल्या आहेत. आताही त्यांचा हा डान्स सगळीकडे गाजतोय.

Intro:खासदार नवनीत राणांनी दांडिया प्रशिक्षनात १५ मिनिट धरला ठेका.

अमरावती अँकर
येत्या 29 तारखेपासून देशभरात नवरात्रौत्सव सुरू होत आहे. या काळात अमरावती शहरात मोठ्या प्रमाणावर गरबा आणि दांडीया नृत्याच्या धमाल कार्यक्रमाचे मोठ्या प्रमाणावर आयोजन केल्या जाते. . त्यासाठी जिल्ह्यात सर्वत्र यासाठी युवती, महिलांना खास प्रशिक्षण आयोजित केलं आहे. अमरावतीतील रचना नारी मंचने दांडीया नृत्याच्या प्रशिक्षणाचं आयोजन केलं आहे. या प्रशिक्षणात अमरावतीच्या नवनिर्वाचित खासदार नवनीत राणा यांनीही हजेरी लावली आणि प्रशिक्षणात सहभाग घेत त्यांनीही नृत्य केल।
जवळपास 15 मिनिटे नवनीत राणा यांनी प्रशिक्षणार्थी महिलांसोबत नृत्यात सहभाग घेतला. अनेक महिलांनाही या दांडिया नृत्यचा आनंद घेतला. या कार्यक्रमाचे व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय आहे. लोकसभा निवडणूक 2019 मध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचा दणदणीत पराभव करणाऱ्या खासदार नवनीत कौर राणा भाजप प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या.
दरम्यान, नवनीत राणा या नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असतात. लोकांमध्ये जाऊन त्यांच्यासोबत कामं करण्याचे त्यांच्या अनेक घटना आहे. कधी वारकऱ्यांसोबत विठू नामाचा गजर तर कधी सोयाबीनची पेरणी केली अशा कामांमुळे त्या नेहमी चर्चेचा विषय ठरल्या आहेत. आताही त्यांचा हा डान्स सगळीकडे गाजतोयBody:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.