ETV Bharat / state

अमरावतीत राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेची जोरदार सुरुवात; पोलीस आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन

एक भारत श्रेष्ठ भारत, खेलो इंडिया आणि भारतीय मलखांब संघटनेच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रात पहिल्यांदाच राष्ट्रीय पश्चिम विभागीय समूह मल्लखांब स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. आज दिमाखदार सोहळ्यात या स्पर्धेचे पोलीस आयुक्त संजय बाविस्कर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

amravati
स्पर्धेचे दृश्य
author img

By

Published : Dec 19, 2019, 10:55 PM IST

Updated : Dec 20, 2019, 1:12 PM IST

अमरावती- शहरातील श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे आजपासून राष्ट्रीय पश्चिम विभागीय समूह मलखांब स्पर्धेला सुरुवात झाली आहे. अमरावतीचे पोलीस आयुक्त संजय बाविस्कर यांनी या स्पर्धेचे उद्घाटन केले. या स्पर्धेत राज्यातील स्पर्धक सहभागी झाले असून उद्घाटन सोहळ्यानंतर मल्लखांबपटूंनी मल्लखांबाचे चित्तथरारक असे प्रकार सादर केले.

एक भारत श्रेष्ठ भारत, खेलो इंडिया आणि भारतीय मलखांब संघटनेच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रात पहिल्यांदाच राष्ट्रीय पश्चिम विभागीय समूह मल्लखांब स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. आज दिमाखदार सोहळ्यात या स्पर्धेचे पोलीस आयुक्त संजय बाविस्कर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तीन दिवस चालणाऱ्या या राष्ट्रीय स्पर्धेत देशाच्या पश्चिम विभागातील महाराष्ट्र, हरियाणा, गोवा, तामिळनाडू, ओरिसा, जम्मू-काश्‍मीर, तेलंगणा या राज्यातील स्पर्धक सहभागी झाले आहेत. आज स्पर्धेचे उद्घाटन झाल्यावर महाराष्ट्रातील स्पर्धकांनी चित्तथरारक असे मलखांब सादर केले. यावेळी, श्री.हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील खेळाडू विद्यार्थ्यांसह अमरावतीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया देताना पोलीस आयुक्त संजय बाविस्कर

उद्घाटन सोहळ्याला मलखांब फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. रमेश इंदोलीया यांच्यासह श्री. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या उपसंचालिका प्रतिभा देशमुख, मल्लखांब फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष धर्मवीर सिंह, सचिव डॉ. अशोक झा, कोषाध्यक्ष दिलीप गव्हाणे, श्री. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. के. देबनाथ, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, महाराष्ट्र अ‌ॅमॅच्युअर मल्लखांब असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र अधिकारी, सचिव श्रेयश म्हसकर आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा- सोयाबीन बियाणे निकृष्ट निघाल्याने मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्याने केला आत्महत्येचा प्रयत्न

Intro:अमरावतीच्या श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे आजपासून राष्ट्रीय पश्चिम विभागीय समूह मलखांब स्पर्धेला सुरुवात झाली आहे अमरावतीचे पोलीस आयुक्त संजय बाविस्कर यांनी या स्पर्धेचे उद्घाटन केले. या स्पर्धेत राज्यातील स्पर्धक सहभागी झाले असून दिमाखदार उद्घाटन सोहळ्यानंतर मल्लखांबपटू मल्लखांबाचे चित्तथरारक असे प्रकार सादर केले.

Body:एक भारत श्रेष्ठ भारत खेलो इंडिया आणि भारतीय मलखांब संघटनेच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रात पहिल्यांदाच राष्ट्रीय पश्चिम विभागीय समूह मल्लखांब स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे . आज या स्पर्धेचे दिमाखदार सोहळ्यात पोलीस आयुक्त संजय बाविस्कर यांनी उद्घाटन केले. उद्घाटन सोहळ्याला मलखांब फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. रमेश इंदोलीया यांच्यासह श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या उपसंचालक प्रतिभा देशमुख, मल्लखांब फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष धर्मविर सिंह, सचिव डॉ. अशोक झा, कोषाध्यक्ष दिलीप गव्हाणे, श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के.के देबनाथ, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, महाराष्ट्र अमॅच्युअर मलखाम असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र अधिकारी सचिव श्रेयश म्हसकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
तीन दिवस चालणाऱ्या या राष्ट्रीय स्पर्धेत देशाच्या पश्चिम विभागातील महाराष्ट्र, हरियाणा, गोवा, तामिळनाडू, ओरिसा, जम्मू-काश्‍मीर, तेलंगणा या राज्यातील स्पर्धक सहभागी झाले आहेत . आज स्पर्धेचे उद्घाटन झाल्यावर महाराष्ट्रातील स्पर्धकांनी चित्तथरारक असे असे मलखांब सादर केले. यावेळी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ आतील खेळाडू विद्यार्थ्यांसह अमरावतीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Conclusion:
Last Updated : Dec 20, 2019, 1:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.